News Update
Home > मॅक्स मार्केट > सरकारने दिलेली शिक्षा म्हणून साजरा केला शिक्षा दिन

सरकारने दिलेली शिक्षा म्हणून साजरा केला शिक्षा दिन

सरकारने दिलेली शिक्षा म्हणून साजरा केला शिक्षा दिन
X

प्रस्तापितांसाठी शिक्षक दिन तर उपेक्षितांसाठी शिक्षा दिन

शिक्षक दिना ऐवजी साजरा केला शिक्षा दिन...

गेल्या विस वर्षांपासून अनुदानाचा संघर्ष कायम...

सरकार ने दिलेली शिक्षा म्हणून साजरा केला शिक्षा दिन

आज संपूर्ण देशात सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन साजरा होत असताना मात्र बुलडाणा जिल्ह्यात हाच दिवस शिक्षा दिन म्हणून साजरा करण्यात आला

खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेत आज पाच सप्टेंबर हा दिवस तोंडाला काळ्या फिती लाऊन डोक्यावर शिक्षा दिन लिहिलेल्या टोप्या ठेऊन शिक्षा दिन म्हणून साजरा करण्यात आला. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सरकार या शाळांना अनुदान देण्यास टाळाटाळ करत असून या शाळेत काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सरकार या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असून त्यांना एक प्रकारे शिक्षा च देत असल्याचे सांगत म्हणूनच आज शिक्षा दिन साजरा करण्यात आल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे

Updated : 5 Sep 2018 9:32 AM GMT
Next Story
Share it
Top