Home > मॅक्स किसान > #माझंमत : ७ वा वेतन आयोग नको, कर्जमाफी करा-अजय गुरधाळकर

#माझंमत : ७ वा वेतन आयोग नको, कर्जमाफी करा-अजय गुरधाळकर

#माझंमत : ७ वा वेतन आयोग नको, कर्जमाफी करा-अजय गुरधाळकर
X

शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो पण, सध्या अशी वेळ आली आहे की त्या राजा चा बळी सर्वात आधिक जातो आहे. आणि हे मुर्दाड सरकार त्याची कसलीही दखल घेत नाही. यांना शेतकऱ्यांविषयी कसलीही आस्था दिसत नाही, निवडणूका आल्या की सगळे राजकीय पक्ष शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन प्रचार करतात. आणि निवडून आल्यावर त्याला भाजीच्या देठासारखा अलगद बाजूला ठेवतात. का हे असं वागतात याना शेतकऱ्यांबद्दल सहवेदना नाहीत का?

सरसकट कर्जमाफी करू नका, पण ज्या शेतकऱ्याच्या घरी शेतीशिवाय इतर कोणतेही उत्पन्न नाही अशा शेतकऱ्याचं कर्ज बेबाकी करणे अत्यंत गरजेचे आहे. जे शेतकरी सधन आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही. पण, ज्या शेतकऱ्याला जगण्यासाठी शेतीशिवाय कोणतीही उपाययोजना नाही अशा शेतकऱ्याला सरकारनं महिना ५ हजार पर्यंत पेन्शन सुरु करावी. जेणेकरून शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकेल. पेन्शन सुरु करण्यासाठी वयोमर्यादा घाला. ४५ वयापेक्षा जास्त शेतकऱ्याला पेन्शन सुरू करण्याची हमी सरकारनं घेणे गरजेचे आहे. ७ वे वेतन आयोग लागू करणे एवढे गरजेचे नाही जेवढी शेतकऱ्यांचे कर्ज बेबाकी करणे गरजेचे आहे.

काही विचारला की सविस्तर अभ्यास करून सगळं ठरवणार, निर्णय घेणार अशी विधाने, आश्वासने मंत्री महोदय देत असतात. पण, यातून ठोस काहीच निर्णय होत नाही. शेतकरी आत्महत्या खूप वाढल्या आहेत. सरकारने याचा सारासार विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • अजय गुरधाळकर

Updated : 22 April 2017 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top