Home > मॅक्स किसान > #माझंमत : पुण्यातील प्राध्यापक डॉ. सी. एम. जोशी यांनी केलेल्या सूचना

#माझंमत : पुण्यातील प्राध्यापक डॉ. सी. एम. जोशी यांनी केलेल्या सूचना

#माझंमत : पुण्यातील प्राध्यापक डॉ. सी. एम. जोशी यांनी केलेल्या सूचना
X

- शक्य असेल तिथे धरणाखाली धरण बांधण्यात यावे.

- सर्व शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक हमी असलेले एटीएम व क्रेडीट कार्ड्स त्वरित देण्यात यावेत.

- शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ग्रामपंचायतीत वेळोवेळी तपासली जावी.

- शेतकऱ्याच्या कुटुंबातील किमान एका सुशिक्षित तरुणाला रोजगार देण्यासाठी खास आरक्षणाची तरतुद व्हावी.

- जलयुक्त शिवार योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्रामपंचायतीला कोणत्याही योजनेचा लाभ देऊ नये.

- सलग दुष्काळ असणारी गावे उद्दयोगपतींना विकासासाठी दत्तक द्यावीत.

- दुरवरून सायफन दुष्काळी गावात आणणाऱ्या उद्योगपतीला करसवलतींबरोबरच सदर पाण्यापैकी काही पाणी द्यावे.

- उत्तरेतील पुराचे पाणी दक्षिणेत आणण्याचे प्रयत्न व्हावेत.

- कोयनाच नव्हे तर शक्य त्या प्रत्येक धरणाचे मागील संचित पाणी वापरण्याचा विचार व्हावा.

- लेक टेपिंग तंत्राचा वापर करून धरणातील न वापरलेल्या पाण्याचा वापर व्हावा.

- प्रत्येक नदीला येणाऱ्या पुराचे पाणी पावसाळ्यात नदीकाठी छोटे तलाव बांधून साठविण्याचे प्रयत्न व्हावेत.

- प्रत्येक नदीकाठी मैलापाणी शुद्धिकरणाचे प्रकल्प सुरू करावेत.

- प्रत्येक गावातून शेतकऱ्यांच्या ५ तरुणांनी आडत्याचे काम करुन शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करावी.

- शेतीमाल, भाजीपाला व फळप्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत.

- बँकांची कर्जपद्धती सुलभ करुन ग्रामिण सावकारांचे समूळ उच्चाटन करावे.

- सामूहिक विवाह, संपूर्ण दारुबंदी, जोडधंद्याची सुलभता या वर भर द्यावा.

  • प्राध्यापक डॉ. सी. एम. जोशी. पुणे

Updated : 22 April 2017 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top