Home > मॅक्स किसान > 'मान्सून ब्रेक' नेमका कशामुळे?

'मान्सून ब्रेक' नेमका कशामुळे?

भारताच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारा मान्सूनचा पाऊस यंदा कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. नेमकं या मान्सूनच्या कमी-जास्त होण्याच्या प्रमाणाला काय नेमकी कारणे आहेत ?मान्सूनचा ब्रेक लागला असेल तर तो कशामुळे ? याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण केला आहे हवामान अभ्यासक विजय जायभाये यांनी..

मान्सून ब्रेक नेमका कशामुळे?
X

"प्रत्येक वर्षी मान्सून च्या काळात मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयच्या पायथ्याशी सरकला की मान्सून ब्रेक मध्य भारत दक्षिण भारतात येतो. जुलै मध्ये 18 जुलै ते 28 जुलै मान्सून चा आस असलेला पट्टा मध्य भारतात सक्रीय होता त्या काळात काही भागात सरासरी इतका पाऊस सरू होता.

मागील एक आठवड्यात मान्सूनचा आस असलेला पट्टा अति उत्तरे कडे सरकत असून मान्सून काळात वाहणाऱ्या trade winds (व्यापारी वाऱ्या) चां प्रभाव कमी होत गेला तसेच (ITCZ) उत्तरे कडे झुकला याचा परिणाम म्हणून बाष्प पुरवठा कमी पडत जाऊन मान्सून ब्रेक परिस्थिती तयार होते.वातावरणात भरपूर घटक पाऊस कमी आणि जास्त होण्यासाठी जबाबदार असतात el nino सक्रिय परिस्थिती आहेच याचा देखील काही प्रमाणात प्रमाणात जाणवतो तसेच MJO ( मेडन जुलैन ऑसिलेशन) ची सायकल देखील मान्सून वर परिणाम करत असते. या वर्षी प्रत्येक महिन्यात 15 तारखे पासून प्रत्यक महिन्याच्या 5/6 तारखे पर्यंत तो हिंदी महासागरवर 3/4/5 या फेज मध्ये सक्रिय आहे. याच काळात समुद्रावर lwo ( कमी दाब ) पट्टे निर्माण होऊन पाऊस वाढण्यास मदत करत आहे. सध्या mjo 6/7/8 या फेज कडे सरकत जाणार असल्यामुळे पुढील दोन आठवडे देखील तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागराच्या दक्षिण मध्य भागात बनणार नाही याचा परिणाम पाऊस कमी राहील. 15 ऑगस्ट नंत्तर mjo पुन्हा पहिल्या फेज पासून सक्रिय करत जाईल त्या काळात ऑगस्ट च्या शेवटी च्या दहा दिवसात मध्य भारतात पुन्हा पाऊस वाढेल.

मान्सून ब्रेक' नेमका कशामुळे?

1.




या वर्षी मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा फक पश्चिम घाटात जास्त पाऊस देत आहे. मध्य महाराष्ट्र वरील पर्जन्य छायचे प्रदेश कमी पाऊस अनुभवत आहे.

2.




मागील तीन वर्षी la nina एक्टिव्ह असल्यामुळे tradewinds व्यापारी वाऱ्याचा प्रभाव तीव्र होता. राज्यातील मध्य भागात पाऊसमान अधिक होते.

3.




2023 ला अरबी समुद्रातील शाखा मध्य भागात बाष्प पोहचवत नसल्याने पाऊस कमी होत आहे. माघारी मान्सून च्या काळात पर्जन्य छाये च्या भागात lwo तयार होऊन बाष्प पुरवठा होतो आणि पाऊस वाढतो.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

4.




उत्तर महाराष्ट्र

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव संभाजी नगर अहमदनगर नाशिक काही भागात पाऊस होईल पुढील तीन दिवस जळगाव धुळे संपूर्ण नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार सर्वत्र मध्यम किरकोळ पाऊस होईल पाऊस होईल .

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5.




कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

6.




मध्य महाराष्ट्र

पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली मध्यम पाऊस पडेल तसेच पुढील दोन तीन दिवस काही ठिकाणी पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

7.




मराठवाडा

"पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धाराशिव काही भागात पाऊस तर काही भागात हलका मध्यम पाऊस होईल."

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

8.




विदर्भ

"पुढील काही दिवस पूर्व विदर्भ नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाना वाशीम सह विदर्भात पावसात अधून मधून किरकोळ सरी या आठवड्यात होतील होण्याची शक्यता काही भागात किरकोळ पाऊस होईल 16/17 नंत्तर सर्वत्र पाऊस वाढणार आहे."

विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक

Updated : 9 Aug 2023 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top