Home > मॅक्स किसान > कांदा निर्यातबंदी कोणासाठी?

कांदा निर्यातबंदी कोणासाठी?

कांदा निर्यातबंदी कोणासाठी?
X

केंद्र सरकारने जून महिन्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळल्याचं जाहीर करत सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. हे दाखवून दिलं होतं. मात्र, आता सरकारने हा निर्णय घेतल्यानं शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. त्यातच अतिवृष्टीने 50 टक्क्याच्या आसपास कांदा वाया गेला आहे. त्यामुळं आपल्या देशात कांद्याचं नियोजन होणं गरजेचं आहे.

ग्राहकांना खुश करण्यासाठी सरकार जर हा निर्णय घेत असेल तर शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावं. अशी मागणी कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. येत्या काळात बिहारच्या निवडणुका असल्यानं जर ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा. लोकांना महागाईचा चटका बसू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असेल तर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. अशी मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे.

मुळात आपल्या देशात किती कांदा लागतो. याची माहिती आपल्याकडे आहे का? असा सवाल देखील बुधाजीराव मुळीक यांनी यावेली उपस्थित केला आहे.

Updated : 24 Sep 2020 4:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top