Home > मॅक्स किसान > हवामानाचा अंदाज चुकतो कसा? म्हणत राजू शेट्टी IMD वर धडकले

हवामानाचा अंदाज चुकतो कसा? म्हणत राजू शेट्टी IMD वर धडकले

शेतकरी संघटना म्हणजे आंदोलन घोषणाबाजी आणि तोडफोड या समीकरणाला छेद देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुख्यालयाला धडक देत हवामान शास्त्रज्ञांची शाळा घेतली.

हवामानाचा अंदाज चुकतो कसा? म्हणत राजू शेट्टी IMD वर धडकले
X

शेतकरी संघटना म्हणजे आंदोलन घोषणाबाजी आणि तोडफोड या समीकरणाला छेद देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भारतीय हवामान विभागाच्या(IMD) मुख्यालयाला धडक देत हवामान शास्त्रज्ञांची शाळा घेतली.

लहरी हवामान आणि कमी पर्जन्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला अंदाज व्यक्त केला असला तरी अवेळी आणि कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकार दरबारी मोर्चा काढण्यापेक्षा थेट आयएमडी मुख्यालयामध्ये जाऊन शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि प्रश्नांची सरबत्ती केली.

दुष्काळ कसा घोषित केला जातो व तो करतांना पर्जन्यमान आणि त्याचा कालावधी कसा असतो? त्याचे निकष काय असतात? इतर देशाप्रमाणे आपल्या देशात हवामानाची माहिती अचूक का दिली जात नाही? ग्लोबल वार्मिंग मधील झालेल्या बदलामुळे हवामान विभाग कशा पध्दतीने काम करत आहे? हवामान विभागाची अचूक माहिती मिळण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित करावे लागेल ? शेतीबरोबर आरोग्यासाठी हवामान विभागाची महत्वपुर्ण भुमिका? यासह विविध विषयावर पुणे येथील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के.एस.होसाळीकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.


भारतीय शेतीच्या व शेतक-यांच्या दृष्टीने हवामान खात्याची भुमिका ही महत्वाची आहे. मात्र केंद्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. हवामानाचे अचूक अंदाज नसल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी बोलताना पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॅा. होसाळीकर म्हणाले की, यावर्षी राज्यामध्ये परतीचा मान्सून हा समाधानकारक असून ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात राजस्थान पासून सुरू झालेला परतीचा मान्सून राज्यात सर्वदूर पाऊस होईल.

वास्तविक पाहता शेतक-यांना हवामानाचे अद्यावत माहिती मिळण्यासाठी तालुक्यातील ब्लॅाक निहाय हवामान निरीक्षण केंद्रे असणे गरजेचे आहे. गेल्या १५० वर्षाचा हवामानाची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. इतर देशाप्रमाणे आपल्या देशात हवामानाचा अंदाज अचूक न येण्यामागे त्या विषवृत देशाची भौगोलिक रचना कारणीभूत असून यामुळे त्यांचा अंदाज अचूक असल्याचे सांगितले.

सरासरी पाऊसाचे निकष हे जिल्हावार न काढता ब्लॉक विभागवार काढणे गरजेचे आहे. उदा. महाबळेश्वर मधे पडणाऱ्या पाऊसा मुळे सातारा जिल्ह्यातील सरासरी जास्त येते मात्र याचा फटका खटाव माण मधील दुष्काळ प्रवण क्षेत्रा मधील शेतकऱ्यांना बसतो आणि परिणाम स्वरूप पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार देतात , दुष्काळ घोषित करण्याची राज्य व केंद्र शासनाची ब्रिटिश कालीन पद्धत बदलणे जरुरी असल्याचे मत व्यक्त करत या बाबत केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

हवामान खात्याच्या लहरीपणाच्या अंदाजामुळे शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून हवामानाचा अचूक अंदाज नसल्याने शेती धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे अचूक हवामानाचे तंत्रज्ञान विकसीत करून हवामान निरीक्षणाचे जाळे वाढवावे लागतील वसई या शास्त्रज्ञांसोबत झालेल्या चर्चेत स्पष्ट झालं.

Updated : 24 Sep 2023 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top