Home > मॅक्स किसान > Weather Alert : खान्देशात गारपिट ; मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस:हवामान विभागाचा अंदाज..

Weather Alert : खान्देशात गारपिट ; मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस:हवामान विभागाचा अंदाज..

Weather Alert : खान्देशात गारपिट ; मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस:हवामान विभागाचा अंदाज..
X

राज्याच्या वातावरणात बदल

राज्याचं वातावरण बदलअसून 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा तर खान्देशात काही भागात गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ढगाळ वातावरण 10 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. 7 जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज होता, त्यानुसार काही भागात तुरळक पाऊस पडला. आता 9 जानेवारीला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर सातपुडा पर्वत रांगांना लागून असलेल्या खांदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांतील काही भागात गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Updated : 7 Jan 2024 5:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top