Home > मॅक्स किसान > MilkPrice: तर तुकाराम मुंडे च्या समर्थनासाठी गावगाडा उभा करू :सदाभाऊ खोत

MilkPrice: तर तुकाराम मुंडे च्या समर्थनासाठी गावगाडा उभा करू :सदाभाऊ खोत

MilkPrice: तर तुकाराम मुंडे च्या समर्थनासाठी गावगाडा उभा करू :सदाभाऊ खोत
X

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारने प्रति लिटर 34 रुपये फिक्स करूनही दूध उत्पादक शेतकऱ्याचे दर दूध संघाने कमी केले. त्या विरोधात विधिमंडळाच्या अधिवेशनात कुणीही आवाज उठवला नाही.. माजी आमदार सदाभाऊ खोत हे हा प्रश्न घेऊन दुग्ध विकास मंत्री आणि दुग्धविकास सचिवांना भेटण्यासाठी आले होते.. काय आहेत दूध संघाच्या क्लुप्त्या दूरधर कमी देण्यासाठी? काय आहे लॅक्टोमीटर मधील दोष? आणि काय सरकारने करायला हवे याविषयी सडेतोड मुलाखत दिली आहे MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांच्यासोबत...

राज्य सरकारने गाईच्या दुधाला 3/5 फॅट आणि 8/5 SNF ला 34 रुपये एवढा दर निश्चित केला आहे. त्याप्रमाणे दरपत्रक देखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध संघांनी 3/5 फॅट आणि 8/5 SNF च्या खाली ज्यांचे गुणप्रत असेल तर त्या दुधाला रिव्हर्स 1 रुपये ठेवलेला आहे. त्यामुळे राज्यातील काही खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर जणू दरोडाच घातला आहे. पूर्वी 1 SNF व फॅटला 30 पैसे कमी होत होते. परंतु काही खासगी दूध संघाकडून चालू दरवाढीमध्ये कमी गुणप्रतीला 1 रुपया दाखविलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे SNF व फॅट्स ही 3/5 , 8/5 पेक्षा कमी लागल्यास शेतकऱ्यांना खूप कमी दराने दूध विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येत आहे. म्हणून SNF आणि फॅट्स मध्ये पूर्वीचाच 30 पैसे हा दर असावा, अशी मागणी आज रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन केली आहे.


तसेच सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाचे दूध गुणवत्ता प्रत तपासणी यंत्र (लॅक्टोमीटर) याची देखील तात्काळ तपासणी करण्यात यावी, ही मागणी देखील सदाभाऊ खोत यांनी लावून धरली. यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मकता दाखवली आहे.





Updated : 27 July 2023 7:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top