Home > मॅक्स किसान > जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची कामे गतीने करा. ही काम पूर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये जलसाक्षरता देखील वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलसाक्षरता वाढावी यासाठी महाजलदूत नमेण्यात अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
X

पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची कामे गतीने करा. ही काम पूर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये जलसाक्षरता देखील वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलसाक्षरता वाढावी यासाठी महाजलदूत नमेण्यात अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली आणि संवाद साधला.

यावेळी अपर मुख्य सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये अनेक बदल करून ही योजना परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या योजनेत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामे पूर्ण करण्याबाबत यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे.

आज ‘पाणी‘ यावर काम करण्यासाठी अनेक खाजगी संस्था पुढे येत आहेत त्यांच्या मदतीने व लोकांच्या सहभागाने या योजनेला चांगली गती मिळत आहे.

कोणतेही काम करताना लोकांना ते आपले वाटणे महत्वाचे असते त्यामुळे या योजनेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे असते. प्रशासन आणि जनतेचा संवाद वाढला की कामाचे यश नक्की असते. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली की काम संपणार नाही तर लोकांमध्ये पाण्याचा वापर जबाबदारीने करण्याबाबत योग्य साक्षरता असणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलपरिपूर्ण गाव तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काम होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये कृषी विभागाचा सहभाग वाढावा यासाठी नवीन अधिसूचना काढण्यात येईल.

या कामांसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देखील घेता येईल याबाबतच्या मंजूरी देण्यात येईल मात्र ही कामे गतीने करावीत.

काम करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून काम करा. पाण्याचे काम हे खुप चांगले काम आहे.

आज खाजगी संस्था स्वयंसेवी संस्था बीजेएस, नाम, पानी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा यामुळे या कामांना एक ग्लॅमर प्राप्त झाले आहे प्रशासनाला यामुळे लोकांचे सहकार्य मिळत आहे तरी लोकांचा सहभाग वाढवून ही कामे पूर्ण करावीत. गावातील सर्व कामे पूर्ण होतील याबाबत खबरदारी घ्यावी.


jalayukta shiwar 2,devendra fadnavis,tv9 marathi live video,marathi batmya live,tv9 marathi live,marathi news live,live marathi news,abp maza marathi live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,batmya marathi live today,marathi news video,shiv sena,maharashtra political crisis,marathi batmya video,marathi news,sharad pawar,eknath shinde,marathi batmya,rahul narvekar,cm eknath shinde,arvind kejriwal,maharashtra unseasonal rain

Updated : 24 May 2023 4:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top