Home > मॅक्स किसान > राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा: शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान...

राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा: शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान...

राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं होतं.त्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा अवकाळी पाऊस आणि वादळाने तडाखा दिला.सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेतीचंही मोठं नुकसान झालं. ह्यावेळेस विदर्भाला मोठा तडाखा दिलाय. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालं. त्याच बरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पाऊस झाला आहे. विदर्भात संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.तसंच खरबूज , टरबूज, गहू, सूर्यफूल, आंबा,कांदा, पपई पिकांचं नुकसान झालं आहे.

राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा: शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान...
X

राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं होतं.त्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा अवकाळी पाऊस आणि वादळाने तडाखा दिला.सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेतीचंही मोठं नुकसान झालं. ह्यावेळेस विदर्भाला मोठा तडाखा दिलाय. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालं. त्याच बरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पाऊस झाला आहे. विदर्भात संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.तसंच खरबूज , टरबूज, गहू, सूर्यफूल, आंबा,कांदा, पपई पिकांचं नुकसान झालं आहे.

ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गरपीठंने राज्याला पुन्हा तडाखा दिलाय.विदर्भात तीन जणांचा मृत्यू झाला आहे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे.गेल्या महिण्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठं मुळे कांदा, गहू हरभरा मका या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं नुकसानीचे पंचनामे झाले मात्र सरकारने अजूनही भरपाई मिळालेलं नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आता पुन्हा शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांना त्वरित भरपाई सरकाने द्यावी अशी मागणी होतेय.

हवामान खात्याचा इशारा-

विदर्भातील बुलढाणा, वासीम, यवतमाळ, अमरावती , अकोला, नागपूर, अकोला , वर्धा या जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्रात तीन दिवस म्हणजेच 8 ते 10 एप्रिल दरम्यानात वादळी वारा आणि पाऊस होणार आहे तर येत्या 24 तासात हलका पाऊस तर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Updated : 8 April 2023 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top