Home > मॅक्स किसान > वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झाली मनुष्य व पशुहानी

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झाली मनुष्य व पशुहानी

गेल्या दीड-दोन महिन्यापासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (rains) होत आहे..

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झाली मनुष्य व पशुहानी
X

संपूर्ण राज्यासह (Maharashtra) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात देखील गेल्या दीड-दोन महिन्यापासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (rains) होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासह (rabbi) फळ बागेचे (fruit crops) मोठे नुकसान झाले आहे. सोबतच मनुष्यहानी (human) आणि पशु (animal) हानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च ते एप्रिल 2023 या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 4 जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. ज्या लोकांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे त्यांना शासनाने प्रत्येकी ४ लांख रुपयांची मदत केली आहे. तर 58 विविध जनावरांचा देखील मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचा मृत्यू झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी दिली आहे. पहा MaxKisan चा स्पेशल रिपोर्ट....



Updated : 7 May 2023 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top