Home > मॅक्स किसान > मराठवाड्यात अवकाळीचा 'तडाखा'

मराठवाड्यात अवकाळीचा 'तडाखा'

मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा
X

औरंगाबाद: गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.

मराठवाड्यात आज सुद्धा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. 19 फेब्रुवारी नांदेडसह, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटंसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

जालन्यातील भोकरदन तालुक्यात गारपीठ

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मालखेडा, पेरजापूर, इब्राहिम परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अर्धा तास झालेल्या या गारपिठीमुळे परीसरातील गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांना फटका बसलाय. बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना चांगलाच तडाखा बसलाय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आल्यानंतर अचानक गारपीट झाली. तर काही भागात पावसानं हजेरी लावल्यानं सोंगणी केलेला गहू,हरभरा या पिकांना फटका बसलाय. तर शेतात काम करत असलेल्या वीज पडून राहुल सुंदरडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

परभणीत गव्हाला फटका

परभणी जिल्ह्यात सुद्धा काही भागात पावसाने हेजरी लावली. गुरुवारी साडेदहाच्या सुमारास परभणी तालुक्यातील पिंगळी, परळगव्हाण या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, हरभऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले.

नांदेड; वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसाने हेजरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर किनवट तालुक्यातील चीचखेड येथील आनंदराव चव्हाण आणि नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील माधव वाघमारे यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

Updated : 19 Feb 2021 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top