Home > मॅक्स किसान > हळद लागवड घोटाळ्याप्रकरणी कंपनीच्या प्रवर्तकाला बेड्या

हळद लागवड घोटाळ्याप्रकरणी कंपनीच्या प्रवर्तकाला बेड्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshayari)यांचा पाठिंबा आणि समर्थन दर्शवत व्हर्टीकल फार्मिंग च्या माध्यमातून 150 गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या AS Agri and Aqua LLP कंपनीचा प्रमुख प्रशांत झाडे (47) ठाणे गुन्हे विभागाने बेड्या घातल्या आहेत.

हळद लागवड घोटाळ्याप्रकरणी कंपनीच्या प्रवर्तकाला बेड्या
X



कृषी प्रदर्शने आणि राजकीय व्यासपीठावरून आधुनिक तंत्रज्ञाने वर्टीकल शेतीच्या माध्यमातून हळद लागवडीसाठी(Termeic cultivation) गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवण्यात आले होते.

यासंदर्भात ठाणे गुन्हे विभाग कडे कासारवडवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश विजयवाडा येथील गृहिणीला AS कंपनीने सुरुवातीला एक कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. सोळा महिन्यानंतर एक कोटी परत देण्यात येतील. त्यानंतर पुढील पाच वर्ष प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये परत देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं.

विजयवाडा येथील महिलेला या कंपनीने सुरुवातीला एक कोटी गुंतवून घेतले त्याचबरोबर आणखी एक कोटी सत्तर लाख रुपये गुंतवण्यास सांगितले त्यासाठी जमीन अयोग्य असल्याचे कारण दिले होते.

विशेष म्हणजे या कंपनीने अनेक राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनामध्ये अशा पद्धतीने प्रमोशन करून शेतकऱ्यांना आकर्षित केले होते. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरला जाहीर कार्यक्रम देखील घेतला होता.

https://theprint.in/ani-press-releases/as-agri-and-aquas-biggest-vertical-farming-project-in-nagpur-inaugurated-by-honble-minister-nitin-gadkari/798067/

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील कंपनीचे प्रवर्तकांसोबत अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात दिसले होते आणि कंपनीने दाखवलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे असे देखील आवाहन माजी राज्यपालांनी केले होते.

यामध्ये राज्यातील आणि देशातील अनेक गुंतवणूकदार आता अडकले असून पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी एक निवृत्त पोलीस अधिकारी यामध्ये लाखो रुपये गुंतवून बसला आहे. अनेकांनी काळा पैसा गुंतवणुकीसाठी हा मार्ग स्वीकारल्याने पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही असेही समजते.

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर कंपनीचे प्रवर्तक प्रशांत झाडे हे गायब झाले होते. ठाणे पोलिसांना त्यांचा भोपाळ या ठिकाणी सुगावा लागला.

प्रशांत झाडे भोपाळ मधून अटक केल्यानंतर सात जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. अशाच पद्धतीने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पोलिसांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांनी या संदर्भात चार्जशीट दाखल केली असून MPID कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

---

गंडा घालण्याची पद्धत नेमकी काय?

As Agri and Aqua LLP कंपनी हळदीच्या वर्टीकल फार्मिंग संदर्भात गुंतवणूक करण्यासाठी जाहिरात करत होती त्यासाठी त्यांनी कृषी प्रदर्शने आणि राजकीय व्यक्तींचा वापर केला. या फसवणुकीमध्ये तुम्ही एक कोटी गुंतवले तर तुम्हाला 16 महिन्यानंतर एक कोटी रुपये मिळणार, त्यानंतर पुढील पाच वर्ष प्रत्येक वर्षी तुम्हाला एक एक कोटी रुपये मिळत राहतील अशा पद्धतीचे प्रलोभन देण्यात आले होते.

सोशल मीडियावर मार्केटिंग करणारा प्रशांत झाडे : https://youtu.be/vII_5_jbhR4

Updated : 10 July 2023 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top