Home > मॅक्स किसान > आवक वाढल्याने टरबूजाचा भाव पडला...!

आवक वाढल्याने टरबूजाचा भाव पडला...!

आवक वाढल्याने टरबूजाचा भाव पडला...!
X

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात (APMC MARKET) खरबूज आणि कलिंगडाची आवक मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यांदा खरबूज व कलिंगडाच्या 50 ते 60 गाड्या यायच्या व आता दिवसाला जवळपास शंभर ते दीडशे गाड्यांची आवक होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी खरबूज 30 ते 35 वरून 25 ते 30 रुपयांवर आला असून कलिंगड 20 रुपयांवरून 15 रुपये कीलो विकला जात आहे. त्यामुळे आवक वाढल्याने दर घसरले आहे. रमजान महिना सुरु असल्याने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून परवडणारे दर असल्याने ग्राहकांची खरेदीला पसंती मिळत आहे. पुढील काही दिवसात आवक वाढली तर दरात आणखी घट होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

कशी होते कलिंगडाची लागवड? जाणून घ्या

राज्यामध्ये कलिंगड हे पिक हंगामानुसार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कलिंगडाची लागवड ही साधारपणे ६६० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. या पिकाची लागवड ही नदीच्या पात्राच्या किनारी त्याचबरोबर बागायती पिक म्हणून देखील केली जाते.

या पिकासाठी हवामान व जमिन कशी असावी लागते?

कलिंगड या पिकांसाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सुर्यप्रकाश हवा असतो. त्याचबरोबर मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमिन या पिकास योग्य असते. जमिनीचा सामू ५.५ ते ७ एवढ्या प्रमाणात योग्य असतो. वेलींची वाढ होण्यासाठी २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस एवढ्या प्रमाणात तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक-अधिक झाल्यास. १८ अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर आणि फळधारणेवर विपरित परिणाम होतो.

किती पध्दतीने लागवड करता येते? (लागवडीच्या पध्दती)

कलिंगडाची लागवड ही बिया लावून करतात कारण त्यांच्या रोपट्यांना स्थलांतर सहन होऊ शकत नाहीत. या पिकांची लागवड साधारपणे ३ प्रकारे केली जाते.

१) आळे पद्धत - ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.

२) सरी वरंबा पद्धत - 2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात

३) रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.

खत व्यपस्थापनात कोणते घटक किती प्रमाणात वापरावे ?

नत्राचे प्रमाण = 50 किलो.

स्फुरदचे प्रमाण =५० किलो.

पालाशचे प्रमाण = 50 किलो.

वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने आणि फळधारणा होऊन फळ वाढीस लागल्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने लागवड केलेल्या जमिनीला नियमित पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे १५ ते १७ पाळ्या द्याव्या लागतात.

कलिंगडाचे वाण किती व कोणकोणते आहेत

१) अर्का ज्योती

२) अर्का माणिक

३) आशियाई यामाटो

४) शुगर बेबी

5) न्यू हँम्प शायर

काढणी व उत्पादन

कलिंगड काढणी ही फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षा थोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची परिपक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.

  • कलिंगडात देठाजवळील बाळी सुकली कि ते तयार झाले असे समजावे.
  • तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.
  • कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .
  • तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.
  • फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.
  • कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल आणि १०० ते १५० क्विंटल येते.

Updated : 26 March 2024 2:28 PM GMT
Next Story
Share it
Top