Home > मॅक्स किसान > विधीमंडळ रोजगार समितीचा मोखाडा दौरा फेल

विधीमंडळ रोजगार समितीचा मोखाडा दौरा फेल

विधीमंडळ रोजगार समितीचा मोखाडा दौरा फेल
X

विधानमंडळाची रोजगार हमी योजना समिती पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना जिल्हाभरात संबधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मीळाले मोखाडा दौऱ्यावर असलेल्या समितीचे अध्यक्ष

प्रशांत बंब आणि त्र्यंबक भिसे व आलेली कमिटी म्हणजे फुसका बार निघाला असून मोरचोंडी येथील सुसज्ज अशी वनविभागाची नर्सरी पाहुन अवघ्या तासाभरातच आपला पाहणी दौरा आटपुन या आमदारांनी वापसी केल्याने आशर्य व्यक्त होत असून खेडोपाडी जावून मजुरांशी बोलुन प्रत्यक्ष एखाद्या रोजगार हमीच्या कामावर भेट देणे गरजेचे असताना केवळ एक तेही चांगल कमा बघून समिती गेल्याने गेल्या काहि दिवसांपासून समिती बाबत असलेल्या अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून आले.

मोखाडा तालूका हा विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेला आहे लोकप्रतिनिधी प्रशासन यांचे दुर्लक्ष यामुळे येथील समस्या अजतायत पाठ सोडायला तयार नाही कुपोषण भूकबळी रोजगारा अभावी होणारे स्थलांतर आदिवासींच्या पाचवीलाच पुजले आहे इथे जॉबकार्ड धारक आणि प्रत्यक्ष मजुर यांच्यात मोठी तफावत आहे.हाताला काम मिळाले तर मजुरी मिळायला वर्ष लागते आठवड्यातून किमा दोन मोर्चे आंदोलन ही केवळ रोजगार हमीच्या कामाबाबत होतात यामुळे आजही स्थलांतर परीणामी कुपोषण अस सगळ वाढत असताना या कमिटीकडुन मोठ्या अपेक्षा होत्या किमान दिवसभर तालुक्यातील विविध भागातील कृषी,तहसील ग्रामपंचायत वनविभाग अशा विभागांची किमान दोन चार कामे तरी पाहणे गरजेचे होते मात्र असे काहीही न होता केवळ डेमो म्हणून असलेली नर्सरी बघून कमिटीने दौरा आटोपला यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.कागदोपत्री मजुरांची संख्या दाखवून सर्व आलबेल चित्र कमिटीला दाखवले गेले असले तरी रोजगाराची अतिशय बिकट अवस्था तालुक्यात असल्याचे चित्र आहे कोणतेच ठोस आश्वासन ना एखादी पारदर्शक कारवाई या समितीनच्या दौऱ्यातून समोर आलेली नाही परंतु अधिकाऱ्यांनी मात्र समितीकडून कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारून घेतली आहे यामुळे हा दौरा निव्वळ शो बाजी ठरला असून या दौऱ्यात फक्त आमदारांनी परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र याचेच दर्शन येथील आदिवासी जनतेला झाले.

Updated : 5 Oct 2018 12:31 PM GMT
Next Story
Share it
Top