Home > मॅक्स किसान > कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
X

नवीन पिक कर्ज आणी जुन्या पिक कर्जाच्या वाटपाच्या मागणी साठी उपोषणाला बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे वय 54 या शेतकऱ्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पाथरी येथील SBI बँकेच्या समोर घडली आहे. तुकाराम काळे हे मागील दोन दिवसा पासून पीक कर्जाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आज या उपोषणाचा तिसरा दिवस होता उपोषणा दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र पुढील उपचारासाठी मानवत येथे नेत असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे बँकेच्या प्रशासनावर कलम 302 प्रमाणे जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यत मृत्यूदेह त्याब्यात घेणार नसल्याचं प्रतिक्रिया शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Updated : 13 Dec 2018 3:32 PM GMT
Next Story
Share it
Top