Home > मॅक्स किसान > कृषीमंत्री महोदय, बियाणे व युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का ?

कृषीमंत्री महोदय, बियाणे व युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का ?

कृषीमंत्री महोदय, बियाणे व युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का ?
X

राज्यभरामध्ये सध्या सर्वत्र शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरू आहे.. सध्या रासायनिक खते व बी बियाणे यांची प्रचंड गरज शेतकऱ्यांना असताना व्यापारी व खतदुकानदार यांच्याकडून साठेबाजी करून खते व बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार खते व बियाणे मिळेनाशी झाली आहेत.. यावर आता स्वाभिमानी आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे..

याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की, काही व्यापारी व खतदुकानदार लिंकीगद्वारे युरिया विक्री करत आहेत.. साठेबाजी व त्यामुळे होत असलेली खते व बियाणे यांची कृत्रिम टंचाई यावर राज्याचा कृषी विभाग मात्र कोणतीही पावले उचलायला तयार नाही.. शासनाचे "भरारी पथक" म्हणजे पांढरा हत्ती प्रमाणे सुस्त बनला आहे अशी जहरी देखील टिका बागल यांनी केली.. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, कृषीविभागाचे अधिकारी व व्यापारी यांच्या छुप्या युतीमुळे आज हंगाम सुरू असताना देखील शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळेनात ही दुर्दैवाची बाब आहे.. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांसोबत आदरणीय राजु शेट्टी साहेबांच्या आक्रमक विचारांसह लढा उभा करेल..अशा साठेबाजांवर,व्यापारी व दलालांवर राज्य शासनाने लवकरात लवकर कडक पाऊले उचलावीत अन्यथा स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा सरकारला इशारा देखील बागल यांनी दिला..

Updated : 25 Jun 2021 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top