Home > मॅक्स किसान > साखर कारखान्यांची धुराडी कधी सुरू होणार? राजू शेट्टी काय म्हणाले..

साखर कारखान्यांची धुराडी कधी सुरू होणार? राजू शेट्टी काय म्हणाले..

तुम्ही दिलेली खिरापत घ्यायला आम्ही तयार नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी कारखानदारांना सुनावला आहे.

साखर कारखान्यांची धुराडी कधी सुरू होणार? राजू शेट्टी काय म्हणाले..
X

एकीकडे राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाला असला तरी कोल्हापुरातली साखर कारखान्यांची धुराडी अद्याप पेटलेली नाहीत. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या वतीने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेची बैठक आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील उसाला चारशे रुपये दिल्याशिवाय धुराडी सुरू करू देणार नाही असा इशारा कायम ठेवला. त्यामुळे कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा प्रशासन आयोजित केलेली ही दुसरी बैठक ही आज निष्फळ ठरली आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधींनी सध्या चारशे रुपयांची रक्कम देण्यासाठी असमर्थता दर्शवली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चारशे रुपयांचा आकडा सोडायला तयार आहे मात्र तुम्ही दिलेली खिरापत घ्यायला आम्ही तयार नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी कारखानदारांना सुनावला आहे.

Updated : 3 Nov 2023 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top