Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांचा देशव्यापी भारत बंद यशस्वी, अखेर अमित शाहा चर्चेसाठी आले पुढे

शेतकऱ्यांचा देशव्यापी भारत बंद यशस्वी, अखेर अमित शाहा चर्चेसाठी आले पुढे

शेतकऱ्यांचा देशव्यापी भारत बंद यशस्वी, अखेर अमित शाहा चर्चेसाठी आले पुढे
X

नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर केंद्र सरकारला त्याची दखल घेत एक पाऊल मागे यावे लागले आहे. भारत बंद यशस्वी होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवली. दरम्यान विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

दरम्यान नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातून उत्तम पाठिंबा मिळाला. त्यानंतर दिल्ली आणि हरयाणामधल्या लोकांची गैरसोय करण्याची कोणतीही इच्छा नसल्याने महामार्ग सोडून रामलीलाल मैदानावर निदर्शनं करण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका मंगळवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंजाब किसान युनियनचे आर एस मंसा यांनी मांडली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीमध्ये देखील आम्ही हे कायदे रद्द करण्याची मागणी करणार आहोत असे देखील मंसा यांनी सांगितलेले आहे. तर बुधवारी केंद्रसरकार सोबत चर्चेची पुढची फेरी होणार आहे या चर्चेमध्ये काही तोडगा निघतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 8 Dec 2020 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top