Home > मॅक्स किसान > #Singhu : शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या खुनाची सखोल चौकशी करा- संयुक्त किसान मोर्चा

#Singhu : शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या खुनाची सखोल चौकशी करा- संयुक्त किसान मोर्चा

#Singhu :  शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या खुनाची सखोल चौकशी करा- संयुक्त किसान मोर्चा
X

दिल्लीमध्ये ३ कृषी कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पण या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाशी शेतकरी आंदोलनाचा कोणताही संबंध नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. संयुक्त किसान मोर्चातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या खुनामागे निहंग शीख असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

संयुक्त किसान मोर्चाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "निहंग समुहाने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मृत तरुणाने धार्मिक ग्रंथाची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडल्याचे या समुहाने स्पष्ट केले आहे. संयुक्त किसान मोर्चा या निर्घृण खुनाचा निषेध करत आहे. तसेच निहंग शीख समुह आणि मृत तरुण यांचा संयुक्त किसान मोर्चाशी कोणताही संबंध नाही. एखाद्या धार्मिक पुस्तकाची किंवा चिन्हाची विटंबना करण्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण त्यामुळे कुणाला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हा खून करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि विटंबनेच्या घटनेची सखोल चौकशी करुन यामागील कट उघड केला पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो. या तपासात संयुक्त किसान मोर्चा पोलिसांनी आणि प्रशासनाला सर्व सहकार्य करेल."

संयुक्त किसान मोर्चाचे सुकदर्शन नाट यांनी सांगितले की, निहंग शीखांचे तंबू हे शेतकरी आंदोलनाच्या मुख्य स्टेजपासून लांब आहेत. याआधीही निहंग शीख यांनी हिंसक प्रकार केले आहेत, पण आतापर्यंत कधी कुणाचा जीव गेला नाही. ते सिंघू बॉर्डरजवळ बसत असले तरी त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी कोणताही संबंध नाही." असे सांगितल्याचे वृत्त इंडियन एस्क्प्रेसने दिले आहे. दरम्यान निहंग शीख यांना आता संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाच्या ठिकाणी राहू देऊ नये अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या कृष्ण प्रसाद यांनी केल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे.

Updated : 15 Oct 2021 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top