Home > मॅक्स किसान > पवारांना धक्का! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार

पवारांना धक्का! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार

Shock to Pawar! Vasantdada Sugar Institute to be investigated

पवारांना धक्का! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार
X

सहकारात खासकरून साखर कारखानदारीत दबदबा असलेल्या शरद पवारांच्या आधीपत्त्याखाली असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची (VSI) आता चौकशी होणार आहॆ. यामुळे अनेक वर्ष राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची ऑडिट होणार असल्याने पवारांना मोठा धक्का मनाला जात आहॆ.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश-

गेल्या १५ वर्षात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला मिळालेला निधी कसा खर्च केला याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शरद पवारांसह या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आदी विश्वस्त असल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्याचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहॆ.

केवळ खर्चाची तपासणी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक बैठक पार पडली होती, त्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संदर्भात काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही संस्था म्हणजे राजकीय अड्डा झाल्याची जाहीर टीका केली होता. पुर्वीच्या मंत्रीमंडळ बैठकीतहीं चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच तपासणीचे आदेश जारी केले आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची ऑडिट चौकशीचे आदेश दिल्याने शेतकरी नेते राजु शेट्टी यांनी स्वागत केल आहॆ खूप अगोदर चौकशी व्हायला हवी होती असं राजु शेट्टी यांनी म्हटलं आहॆ.

बदनामीचा प्रयत्न - रोहित पवार

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश म्हणजे संस्थेच्या बदनामाची प्रयत्न आहे. असं राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार प्रतिक्रिया दिली आहॆ.

भाजपने आता 'बारामतीकडं' मोर्चा वळवला असा त्याचा अर्थ आहे. भाजपल कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. हा कुबड्यांवरील अवलंबि कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना, हे लवकरच स्पष्ट होईल. नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहॆ.

Updated : 29 Oct 2025 8:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top