Home > मॅक्स किसान > VIDEO: शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे प्रेम कधी पासून जागं झालं: खोतकरांची दानवेंवर टीका

VIDEO: शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे प्रेम कधी पासून जागं झालं: खोतकरांची दानवेंवर टीका

VIDEO: शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांचे प्रेम कधी पासून जागं झालं: खोतकरांची दानवेंवर टीका
X

जालना: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकऱ्यांना थेट मदतीची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

दानवे शनिवारी पैठण दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे सध्या माझं कुटूंब माझी जबाबदारी यातच व्यस्थ असल्याची टीका केली होती. तर ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याचं ही दानवे यांनी म्हटलं होते.

दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला. ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधी पासून जागं झालं, असा खोचक टोला खोतकर यांनी दानवेंना लगावला आहे.

तर भाजप नेत्यांना काय झालंय माहित नाही. मात्र, या भाजप नेत्यांच्या मतदार संघात सुद्धा पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का? असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला आहे.


Updated : 2020-10-18T18:28:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top