Home > मॅक्स किसान > बियाणे आणि खतांच्या अनागोंदीची तक्रार करा: शेतकऱ्याचं नावं गुप्त ठेवण्यात येईल....

बियाणे आणि खतांच्या अनागोंदीची तक्रार करा: शेतकऱ्याचं नावं गुप्त ठेवण्यात येईल....

बियाणे आणि खतांच्या अनागोंदीची तक्रार करा: शेतकऱ्याचं नावं गुप्त ठेवण्यात येईल....
X

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरुद्ध शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात

आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे.

ह्या नंबर वर करा बिना संकोच करा तक्रार -

शेतकरी व वितरकांना सहाय्य करण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अडचणी व तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधा, किंवा [email protected] वर ई-मेल पाठवा.

राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील,एखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर अशा विक्रेत्यांविरुद्ध तक्रारी या दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.अशी माहिती धनंजय मुंडे मुंडे यांनी दिली आहे.

मागील वर्षी देखील कृषीमंत्री मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारीची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून, एक व्हॉट्सअप क्रमांक कार्यान्वित केला आहे.

Updated : 11 Jun 2024 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top