…अखेर जीवनावश्यक वस्तूमधून कांदा हटवला

Reforms In Essential Commodities Act, Announces Nirmala Sitharaman
Reforms In Essential Commodities Act, Announces Nirmala Sitharaman

गेल्या काही वर्षापासून कांद्यांचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारने कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये केला होता. त्यामुळं शेतकऱ्यांना वारंवार तोटा सहन करावा लागत होता. मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीवनावश्यक वस्तू मधील डाळी, खाद्यतेले, कांद्यावरचे नियंत्रण हटवले आहे. या पुढे शेतकऱ्यांना परराज्यातही आपला माल विकता येणार आहे. या संदर्भात केंद्र सरकार लवकरच कायदा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज ची घोषणा केली आहे. या पॅकेडच्या अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी ही घोषणा केली आहे.

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी…

कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी
मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपयेभाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’, भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान
मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल
वनौषधींसाठी 4 हजार कोटी
फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी
मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी
पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी
दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी