Home > मॅक्स किसान > 'एकरी 37500 रुपये एवढा लाभ शेतकऱ्यांना मिळणार' वाचा सविस्तर बातमी

'एकरी 37500 रुपये एवढा लाभ शेतकऱ्यांना मिळणार' वाचा सविस्तर बातमी

एकरी 37500 रुपये एवढा लाभ शेतकऱ्यांना मिळणार वाचा सविस्तर बातमी
X


सरकारकडून गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शेतीशिवार असं अभियान राबवण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या शेतामध्ये काही जमीन जर खराब असेल तिथं गाळ टाकायचा असेल तर सरकार आता अनुदान देणार आहे त्या अनुदानाचा लाभ सरळ सरळ शेतकऱ्यांना मिळणार असून, या धोरनाचा लाभ तुम्ही कसा घ्याल अर्ज कसा कराल याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. गाळमुक्त शिवार आणि गाळमुक्त शेतीशिवार या योजनेअंतर्गत राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे जे जवळचे धरण आहेत त्यांच्या मधला जो गाळ काढणे आणि तो गाळ शेतामध्ये टाकणं याच्यासाठी राज्य सरकार अनुदान सुद्धा देणार आहेत आणि हे अनुदान मर्यादित असणार आहे.

या योजनेअंतर्गत आपला ट्रॅक्टर आणि इतर गाळ काढण्याची मशीन यांच्यामार्फत आपल्याला आपल्या शेतामध्ये गाळ टाकावे लागेल जवळचा धरण असो किंवा शेततळ असो यांच्यातला जो गाळ आहे तो काढून ट्रॅक्टरच्या मार्फत आपल्या शेतामध्ये टाकावा लागणार आहे. याची मर्यादा सुद्धा असणार आहे की तुम्ही किती शेतीत हे गाळ टाकू शकता. याची मर्यादा एक ते दीड एकर पर्यंत आहे आपण एक ते दीड एकर शेतामध्येच गाळ टाकू शकतो आणि याच्यासाठी जो गाळ काढण्यासाठी सामग्री लागेल आणि त्याच्यासाठी अनुदान मिळणार आहे. एकरी 37500 रुपये एवढा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती या योजनेत दिली आहे. विशेष म्हणजे विधवा अपंग यांना हा विशेष लाभ देण्यात येणार आहे, यांना या योजनेचा सर्वात अगोदर लाभ मिळणार असल्याच असं सुद्धा योजनच्या जीआरमध्ये सांगितलेला आहे. योजणेचा लाभ मिळवण्यासाठी संबधित योजनेच्या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

Updated : 21 Jan 2024 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top