Home > मॅक्स किसान > आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा

आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा

मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.हवामान विश्लेषक विजय जायभावे यांनी विभागनिहाय वर्तवलेला अंदाज

आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा
X

मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.हवामान विश्लेषक विजय जायभावे यांनी विभागनिहाय वर्तवलेला अंदाज

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈⛈️⛈️⛈⛈️

1.उत्तर महाराष्ट्रात मुसळधार

उत्तर महाराष्ट्र जळगाव, नंदुरबार,धुळे, उत्तर भाग आणि विदर्भ चे उत्तर भाग अकोला, अमरावती, बुलढाणा उत्तर भाग मुसळधार तसेच दक्षिण भागात नाशिक,संभाजी नगर, अहमदनगर मध्यम झडी अधून पाऊस होईल. 21 सप्टेंबर नंत्तर 22/23/24 सप्टेंबर राज्यात पुन्हा मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात देखिल वळीव पाऊस होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

2. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्टे

हिंदी महासागरावर IOD पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये आला असून MJO देखिल 3/4/5 फेज मध्ये सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे पुढील दोन तीन आठवडे सतत निर्माण होतील.


3. विदर्भ मराठवाड्यातही पाऊस

"मध्य भारतात मात्र विदर्भ मराठवाडा विभागात आणि मध्य प्रदेश छतीसगड उदीसा तेलगंणा या राज्यात चांगला पाऊस होईल".




⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

4. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार

उत्तर महाराष्ट्र 16 सप्टेंबर

पुढील दोन तीन दिवस नंदुरबार,धुळे, जळगाव उत्तर भागात पावसाची शक्यता जास्त आहे. नाशिक, संभाजी नगर, अहमदनगर उत्तरे कडील भागात देखिल काही भागात मध्यम पाऊस राहील. त्या नंत्तर 22/23/24 सप्टेंबर पासून काही भागात पाऊस वाढेल आणि मध्य भागात आणि परिसरात मुसळधार पाऊस काही भागात होईल.




⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5.कोकणात जोरदार पाऊस

कोकण, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर काही भागात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस होईल.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

6.मध्य महाराष्ट्रात किरकोळ आणि हलका पाऊस

मध्य महाराष्ट्र 16 सप्टेंबर पुढील तीन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, काही भागात मध्यम किरकोळ पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलका पाऊस होईल.पुढील आठवड्यात पासून 21/22/23/24 सप्टेंबर काही भागात मुसळधार पाऊस काही भागात होईल मध्यम पाऊस राहील.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

7.मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस

मराठवाडा 16 सप्टेंबर

पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस होईल. 21/22/23/24 सप्टेंबर नंतर देखील काही भागात पाऊस जोरदार वळीव राहील.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

विदर्भ 16 सप्टेंबर

8.विदर्भात जोरदार पाऊस

विदर्भ, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाना, अकोला मध्यम पाऊस होईल 17/18 सप्टेंबर मध्यम ते जोरदार पाऊस होईल 21/22/23 सप्टेंबर जोरदार पाऊस होईल.




Updated : 16 Sep 2023 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top