Home > मॅक्स किसान > पुढील तीन दिवस पावसाचे

पुढील तीन दिवस पावसाचे

पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस पावसाचे
X

पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुळधार पावसाची, तर राज्यात आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आजपासून विदर्भात, २१ तारखेपासून मराठवाड्यात व २२ तारखेपासून मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक यांनी मॅक्स किसान साठी वर्तवलेला हवामानाचा अंदाज...

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈⛈️⛈️⛈⛈️

1.राज्यात ढगाळ वातावरण

राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान तसेच उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे परिसरात किरकोळ पाऊस होईल.तसेच उत्तर विदर्भ आणि या भागात देखिल




2. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा

किरकोळ ठिकाणी पाऊस होईल बंगालच्या उपसागरावर काल पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून याचा मार्ग विदर्भ मध्य प्रदेश छत्तीसगड या भागातच होणार आहे.


3. राज्यात हलका मध्यम पाऊस

22/23/24 सप्टेंबर याचा परिणाम विदर्भात होईल काही भागात जोरदार ते मध्यम पाऊस होईल. राज्यात इतर सर्वत्र हलका मध्यम वळीव सुरूपाचा पाऊस होईल. जास्त तीव्र पावसाची शक्यता नाही. 27/28 सप्टेंबर अरबी समुद्रा लगत हालचाली होतील आणि याचा परिणाम म्हणून राज्यात मध्यम पाऊस होईल.


4.मराठवाडा विदर्भात पाऊस

बंगाल च्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचा पट्टा ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात निर्माण होईल याचा मार्ग कोणत्या दिशेने होईल या परिस्थिती वर राज्यातील पाऊस अवलंबून राहील.सध्या त्याचा प्रवास उत्तर पश्चिम होईल म्हणजे आंध्र तेलंगना कर्नाटक किंवा मराठवाडा विदर्भ या भागात होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5. पुढील दोन-तीन आठवडे कमी दाबाचे पट्टे

हिंदी महासागरावर IOD पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये आला असून MJO देखिल 3/4/5 फेज मध्ये सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे पुढील दोन तीन आठवडे सतत निर्माण होतील.


6. मध्य भारतात पाऊस

मध्य भारतात मात्र विदर्भ मराठवाडा विभागात आणि मध्य प्रदेश छतीसगड उदीसा तेलगंणा या राज्यात चांगला पाऊस होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

7.उत्तर महाराष्ट्र

पुढील दोन तीन दिवस नंदुरबार धुळे जळगाव उत्तर भागात मध्यम पावसाची शक्यता आहे.




8.

नाशिक, संभाजी नगर, अहमदनगर उत्तरे कडील भागात देखील काही भागात किरकोळ मध्यम पाऊस राहील. त्या नंत्तर 22/23/24 सप्टेंबर पासून काही भागात पाऊस होईल मात्र सार्वत्रिक किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस नाही.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

9.कोकणात जोरदार पाऊस

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

10.

मध्य महाराष्ट्र पुढील तीन दिवस पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली काही भागात मध्यम किरकोळ पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलका पाऊस होईल.पुढील आठवड्यात पासून 21/22/23/24 सप्टेंबर फक्त काही भागातच पाऊस होईल काही भागात किरकोळ पाऊस राहील.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

11.मराठवाडा

पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धराशिव काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस होईल. 21/22/23/24 सप्टेंबर नंतर देखिल काही भागात पाऊस राहील.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

१२.विदर्भ

विदर्भ नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशीम बुलढाना अकोला मध्यम पाऊस होईल. 19/20 सप्टेंबर मध्यम पाऊस होईल 21/22/23 सप्टेंबर जोरदार पाऊस काही भागात होईल.





Updated : 20 Sep 2023 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top