Home > मॅक्स किसान > #BharatBandh : शेतकऱ्यांचा भारत बंद, अनेक ठिकाणी निदर्शन आणि मोर्चे

#BharatBandh : शेतकऱ्यांचा भारत बंद, अनेक ठिकाणी निदर्शन आणि मोर्चे

#BharatBandh : शेतकऱ्यांचा भारत बंद, अनेक ठिकाणी निदर्शन आणि मोर्चे
X

केंद्रीय कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे भारत बंदच्या आवाहनाला देशभरातील विविध विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा देत आज आंदोलन केली. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे केले आहेत. त्या अनुषंगाने भारत बंदची हाक देण्यात आली होती.त्याला सोलापुरातील कामगार व शेतकरी संघटनेने पाठिंबा देत सोलापुरातील असलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी बंद करण्याचे आवाहन यावेळी कामगार संघटनेने केले. या आंदोलनावेळी माकपच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माकप नेते माजी आमदार रसय्या आडम यांच्यासह आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Updated : 27 Sep 2021 7:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top