Home > मॅक्स किसान > #FarmerProtest : पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचे समर्थन, विरोधकांचा सभात्याग

#FarmerProtest : पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचे समर्थन, विरोधकांचा सभात्याग

#FarmerProtest : पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचे समर्थन, विरोधकांचा सभात्याग
X

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांनंतर कोणतीही बाजार समिती बंद झालेली नाही आणि हमीभावही रद्द झालेला नाही, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, या कायद्यांमुळे आधीच्या कोणत्याही तरतुदी रद्द होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याने या कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात केवळ खोटी माहिती देऊन भीती निर्माण केली गेल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पंतप्रधानांच्या मुद्द्यांना आक्षेप घेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधींसह काँग्रेसच्या सर्व खासदारांनी सभात्याग केला.

संसदेच्या कामकाजात आणला जाणारा व्यत्यय हा विरोधकांच्या रणनीतीचा भाग आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. सरकारच्या मनात शेतकऱ्यांबाबत कोणताही राग नाही. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी यावे कायद्यामध्ये जे अयोग्य असेल ते काढले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Updated : 10 Feb 2021 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top