Home > मॅक्स किसान > ...और मोदी कह रहेया किसान आमदनी दुगनी कर दुंगा कैसे होगा?

...और मोदी कह रहेया किसान आमदनी दुगनी कर दुंगा कैसे होगा?

...और मोदी कह रहेया किसान आमदनी दुगनी कर दुंगा कैसे होगा?
X

देशाच्या अन्नदात्याची सध्या सिंघू बॉर्डरवर जमीन आणि जमीरसाठी लढाई सुरु आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतक-यांनी अमाप कष्ट करून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण केले. मात्र, केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्याची या शेतक-यांना आता भीती वाटते आहे. नवीन कायदयाने आपली शेती धोक्यात आल्याची भावना या शेतक-यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या दोन्ही राज्याच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत.

या आंदोलना संदर्भात दिल्ली सरकारद्वारा विविध पुरस्काराने सन्मानीत केलेल्या प्रगतशील शेतकरी सुखबीर सिंह यांच्याशी आम्ही त्यांच्या शेतात जाऊन बातचीत केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.

"गेल्या ५ ते ७ वर्षात डिझेल वाढलं, खत वाढलं, मात्र, धानाचा दर कमी झाला. मोदी है तो मुमकीन है? ये तो उलटा होइ रहा है भाई... क्या मुमकीन हो रहा है... किसान खेती कैसा करेगा....आमच्या घरात पूर्वी शेतीवर पाच ते सात लोक अवलंबून होते. आता शेतीवर पंधरा लोक अवलंबून आहेत. 2013 ला धानाला 3550 भाव होता तो 2020 ला 1837 झाला. कुटुंबातील सदस्यांची वाढती संख्या आणि धानाचा उतरलेला दर पाहता आम्ही शेतीवर घर कसं चालवायचं? असा सवाल सुखबीर सिंग यांनी केला आहे. एवढी मोठी शेती चालवणं आता शक्य नाही अशी हतबलता नवीन कायद्यांबाबत बोलताना सुखबीर सिंह व्यक्त करतात.



"मला या कायद्याची भीती वाटते. माझी जमीन हा कायदा कंत्राटदारच्या हातात देईल. हा कायदा परत घेतला नाही तर मी माझे सर्व पुरस्कार सरकारला परत देईन," असा इशारा सुखबीर सिंह यांनी सरकारला दिला आहे.

"मोदी असो किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असो सगळे सारखेच आहेत. शेतक-यांचे त्यांना काही देणे घेणं नाही. MSP पेक्षा कमी भावात माल विकत घेतला जातो. तरीही मोदी केजरीवाल काय कारवाई करतात?" असा सवाल सुखबीर सिंह विचारतात. योग्य हमीभाव मिळाला नाही तर देशांतील शेतकरी अधिक संकटात येईल, असं मत सुखबीर सिंह यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले.

Updated : 11 Dec 2020 4:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top