भारतीय टोमॅटोला पाकिस्तानशी वाट मोकळी करा
शेतमाल व्यापार हा महत्त्वाचा घटक असून दक्षिण आशियाई देश भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बांगला देशाबरोबरच पाकिस्तानमध्ये मोठी मागणी असल्याने टोमॅटो निर्यातीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत कृषी विश्लेषक दीपक चव्हाण...
X
पाकिस्तान भारताकडून कॉटन आयात करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आलीय. टोमॅटोसाठीही पाकिस्तानने दरवाजे खुले करावेत, यासाठी पाठपुरावा गरजेचा वाटतोय. संबंधित टोमॅटो उत्पादक विभागातील शेतकऱ्यांकडून आपआपल्या खासदारांकडे पाठपुरावा आवश्यक आहे. मधल्या काळात दोन्ही देशांकडून शेतमाल व्यापारावर निर्बंध घालण्यात आले होते.
अपेडाकडील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पाकिस्तानला ३६८ कोटी रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली होती; त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये केवळ ३४ लाख रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली. पुढच्या दोन वर्षांत निर्यात ठप्प आहे. पाकिस्तानकडून मागणी येते तेव्हा नाशिकहून 100 ते 150 ट्रक रवाना झाल्याच्या नोंदी आहेत.
महाराष्ट्राच्या फलोत्पादनासाठी बांगलादेश इतकेच पाकिस्तानचे मार्केट महत्त्वाचे आहे. अलिकडेच, चीन हा भारतासाठी सर्वांत मोठा व्यापारी भागिदार असल्याची आकडेवारी समोर आली. राजकीय वास्तव आणि आर्थिक वास्तव भिन्न असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या दृष्टिने पाकिस्तान बरोबर शेतमालाचा व्यापार शेतकरीहितासाठी सुरळीत होणे गरजेचे वाटते.
- दीपक चव्हाण






