Home > मॅक्स किसान > पंतप्रधान मोदींचा नाशिक दौऱ्यापूर्वीच कांदा प्रश्न चिघळला...

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौऱ्यापूर्वीच कांदा प्रश्न चिघळला...

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौऱ्यापूर्वीच कांदा प्रश्न चिघळला...
X

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

उद्या नासिक येथ युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. कांदा निर्यातबंदी मागे घेऊनच दौरा करावा, कांदा उत्पादकांसाठी काय करणार हे जाहीर करावे, अशी मागणी विविध शेतकरी संघटनानी केली आहे.

पंतप्रधानांच्या नासिक दौऱ्याला कांदा उत्पादकांचा विरोध आहे. कांदा निर्यात बंदी प्रश्नी पंतप्रधान काय बोलतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

दौऱ्यापूर्वी कांदा प्रश्न निकाली काढा अन्यथा संघर्ष : डॉ अजित नवले

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकला येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कांदा उत्पादकांसाठी ते काय करणार हे जाहीर केले पाहिजे. ते केले नाही तर उद्रेक अटळ आहे. कांदा उत्पादक रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाहीत. असा ईशारा अखिल भारतीय किसान सभा चे नेते डॉ. अजित नवलें यांनी दिला आहे.

दौऱ्यात कांदे मारण्याचा इशारा: रयत क्रांती संघटना

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना १२ जानेवारीपर्यंत निर्यातबंदी माघारी घ्यावी , नाहीतर नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदे मारू, आमचा राग व्यक्त करावाच लागणार आहे अशी भूमिका रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार घेतली आहे.

मोदींच्या भेटीची मागणी :

पंतप्रधानांबरोबर भेट घडवून आणा कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनां संबंधी चर्चेसाठीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी थेट बोलावे, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यासाठी पंतप्रधानांशी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी. चर्चेसाठी वेळ द्यावा, असे निवेदन मंत्री गिरीश महाजन यांना संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले.

Updated : 11 Jan 2024 5:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top