Home > मॅक्स किसान > इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी

इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी

इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते.परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही

इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
X

इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते.परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही. एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडीसोबतचे संबंध तोडल्यानंतर नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधेलेला नव्हता. किमान महाविकास आघाडी का सोडली हे तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारायला हवे होते. परंतु तसा काही संवाद झाला नाही आणि आम्ही ही त्याचा पुर्नविचार केला नाही.महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्ष इंडिया आघाडीत गेले आहेत

मात्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेने तसा निर्णय घेतलेला नाही.देशभरातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येवून एमएसपी गँरटी मोर्चा स्थापन केलेला आहे. त्याचा घटक स्वाभीमानी शेतकरी संघटना आहे.याची 19 ऑगस्टला बैठक झाली ,यामध्ये जोपर्यंत एमएसपी गँरटी नाही तोपर्यंत मत नाही,कोणताही निर्णय नाही अशी भूमिका घेण्यात आली.जो काही निर्णय होईल तो 27 राज्यातील शेतकरी संघटना घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही, असेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.


Updated : 30 Aug 2023 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top