Home > मॅक्स किसान > महिलांनी केला नव्या पिकाचा प्रयोग यशस्वी

महिलांनी केला नव्या पिकाचा प्रयोग यशस्वी

कोणीतरी येऊन आपलं भलं करेल या दिवा स्वप्नात न राहता कोकणातील महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात एक अभिनव प्रयोग करत कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे…राबगाव येथील गजानन महिला बचत गटाच्या महिलांनी संघटित होऊन कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी पाऊल टाकलं. या महिलांनी एकत्रित येऊन दोन ते तीन एकर मध्ये भुईमूग व हळदीचे पीक घेतले आहे. त्यांच्या श्रमाचे फलित होऊन आजघडीला पिकं बहरले आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...

महिलांनी केला नव्या पिकाचा प्रयोग यशस्वी
X

कोकणातील शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतोय, अतिवृष्टी, Maharashtra Uncertain Rain, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या आपत्तीसह हवामान बदलाचा येथील पीक उत्पादनावर मोठा परिणाम होतोय, कोकणातील माणूस कष्ठाळू, जिद्दी… मात्र, निसर्गाच्या असमतोलामुळे सातत्याने होत असलेल्या नुकसानीने तो मेटाकुटीला आला आहे. मात्र, कोणीतरी येऊन आपलं भलं करेल या दिवा स्वप्नात न राहता कोकणातील महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात एक अभिनव प्रयोग करत कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे…राबगाव येथील गजानन महिला बचत गटाच्या महिलांनी संघटित होऊन कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले. या महिलांनी एकत्रित येऊन दोन ते तीन एकर मध्ये भुईमूग व हळदीचे पीक घेतले आहे.




त्यांच्या श्रमाचे फलित होऊन आजघडीला पिकं बहरले आहे. निसर्ग व हवामानात कितीही बदल झाले, अथवा परिस्थिती कोणतीही असो मात्र खचून न जाता मोठ्या हिंमत्तीने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचायचे यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची तयारी येथील महिलांनी दाखवली, कृतीत उतरवली. कृषितज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही भुईमूग व हळदीचे पीकाचा प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. भातपिकी असलेली जमीन आता भुईमूग लागवडीखाली आणायची होती. याकरिता महिलांनी सुरवातीस राब प्रक्रिया अवलंबली, नांगरणी पेरणी करून पिकांची निगा राखली.





राबगाव येथे भुईमूग लागवड करणाऱ्या ज्येष्ठ महिला शेतकरी माधुरी भोईर यांनी सांगितले की रायगड़ जिल्हा भाताचे कोठार म्हणुन ओळखला जातो, मात्र आता नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका भात पिकाला बसतोय. त्यामुळे निसर्गाचा कोप होत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय. कोकणातील शेती सतत ओलिताखाली येते, पिकांची नासधुस होते, आम्ही गजानन महिला बचत गट राबगाव यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली व कृषि केंद्र रोहा यांचे मार्गदर्शन घेतले, व आम्ही महिलांनी एकत्रित येवून शेतीत नवीन प्रयोग केला, सलग तीन वर्ष आम्ही भुईमुग व हलदी चे पिक घेत आहोत, या पिक उत्पादनातून चांगला नफा मिळतोय, असे भोईर म्हणाल्या.





महिला शेतकरी सुरेखा भोईर यांनी कोकणातील नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. आम्ही पूर्वी भातपिक घ्यायचो, मात्र पिक कापनीला आले की मुसळधार पाऊस कोसळत असे. व भातपिक उध्वस्त व्हायचे, यावर्षी देखील परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे, या नित्यनियमित परिस्थिती ने आम्ही महिला शेतकरी अक्षरश रडायचो, मग आम्ही आमच्या काळ्या मातीत भुईमुग लागवडीचा पर्याय अजमावुन बघितला, आम्ही कोणते रासायनिक खत वापरत नाहीत, तर सेन्द्रिय शेती केली जाते, हा आमचा प्रयोग यशस्वी झाला याचा मनस्वी आनंद होतोय.





महिला शेतकरी सरिता वातेरे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की अवकाली पावसात भातशेती पूर्णपणे उध्वस्त होते,येथील शेतकरी हतबल होतो,जगावे की मरावे अशी त्याची द्विधा मनःस्थिती होते, मात्र कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही, भातशेती चे उत्पादन घटत असल्याने आम्ही दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असणारे भुईमुग व हळदी चे पिक घेण्याचा निर्धार केला. आज आमच्या कष्टाचे चीज झाले, तीन एकरमध्ये भरघोस पिक आले असून चांगला आर्थिक नफा होणार आहे.





शेतकरी अंजना भोईर म्हणाल्या की आम्ही सर्व महिला वयस्कर आहोत, तरी देखील आम्ही एकत्र आलो व काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे मनोमन ठरवले, बाजारात शेंगदाने व हळदी ला मागणी आहे, महाराष्ट्र राज्यातील महिलानी शेतीत नवनवीन प्रयोग करावेत व प्रगती साधावी . असे आवाहन केले आहे. सुधागड तालुक्यातील राबगाव येथील महिला शेतकऱ्यांनी अभिनव प्रयोग करून भुईमूग व हळदीचे भरघोस उत्पादन काढले असून त्यांच्या या जिद्दी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Updated : 18 Oct 2022 10:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top