Home > मॅक्स किसान > मल्टी - हॉर्टिकल्चर क्रॉपिंग सिस्टिम - दीपक चव्हाण

मल्टी - हॉर्टिकल्चर क्रॉपिंग सिस्टिम - दीपक चव्हाण

शेतीमधील नवनवीन प्रयोग आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर काय फायदो होतो याच्याबद्दल सांगत आहेत शेती अभ्यासक दीपक चव्हाण

मल्टी - हॉर्टिकल्चर क्रॉपिंग सिस्टिम - दीपक चव्हाण
X

देवरे 2.0

पारनेर, ता. सटाणा येथील मयूर देवरे यांच्या दोन एकरातील ऑफ सिजन द्राक्ष बागेचे हार्वेस्टिंग सुरू आहे. दीड एकरात शरद सीडलेस तर अर्ध्यात सरीता सीडलेस वाणाला 140 रुपये प्रतिकिलो दर मिळालाय. दोन एकरात 10 ते 12 टनादरम्यान उत्पादन मिळेल.

16 ते 18 टन अनुमानित उत्पादनात यंदा 40 टक्के घट आहे. बाजारभाव किफायती मिळाल्यामुळे दोन एकराचा प्लॉट यशस्वी झाला असे म्हणता येईल. दोन एकरातील एकूण उत्पन्नात खर्चाचा वाटा 20 टक्के आहे. यंदाच्या अतिपावसामुळे डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आल्याचे मयूर यांचे म्हणणे आहे. यंदाच्या हंगामाला कोरोनाची पार्श्वभूमी होती. नेमकी छाटणी केव्हा घ्यावी इथून समस्या होत्या. मयूर यांनी 26 जुलैला छाटणी केली होती. आणि पुढे यशस्वीपणे नियोजन केलेय.


मुख्य मुद्दा:

मयूर यांनी इंटरक्रॉपिंगचे खूप चांगले मॉडेल विकसित केले आहे. त्यांच्या शेतातील क्रिमसन द्राक्ष वाणाच्या प्लॉटमध्ये देशी वांग्याचे हार्वेस्टिंग आता पूर्णत्वाकडे आहे, तर डाळिंबाच्या प्लॉटमध्ये बारटोक वांगे सुरू झाले आहे. दोन्ही पिकांमधील प्रारंभीची मूलभूत गुंतवणुक आंतरपिकांद्वारे काढण्याच्या यशस्वी पॅटर्नचे आणखी एक यशस्वी उदाहरण मयूर देवरे यांनी दिले आहे. (याबाबत सविस्तर लवकरच लिहिणार आहे)...

द्राक्ष, डाळींब, कांदा, वांगी आदी हॉर्टिकल्चर क्रॉप्सचे यशस्वी उत्पादन घेण्याचे कौशल्य मयूर यांनी प्राप्त केले आहे. वडील श्री. संजय देवरे यांच्याकडून द्राक्ष शेतीच्या वारशाचे रुपांतर मल्टी - हॉर्टिकल्चर क्रॉपिंग सिस्टिममध्ये केले आहे. अशाप्रकारे दुसऱ्या पिढीने एक पाऊल पुढे टाकले आहे...महाराष्ट्रातील हॉर्टिकल्चर अॅग्रीकल्चरमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने काम करणाऱ्या नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून मयूर देवरेंचे नाव घेता येईल. अभिनंदन आणि शुभेच्छा.



Updated : 18 Nov 2020 1:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top