Home > मॅक्स किसान > मान्सून आला तरी पावसाचा घोडं अडलं कुठं?

मान्सून आला तरी पावसाचा घोडं अडलं कुठं?

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र सर्वदूर पाऊस का पडत नाही? याची कारणे काय आहेत? याबरोबरच ढग उंचीवर आहेत का? आणि असतील तर चांगल्या पावसासाठी ढग किती उंचीवर असावे लागतात? याविषयी संपुर्ण माहिती देणारा हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा लेख

मान्सून आला तरी पावसाचा घोडं अडलं कुठं?
X

ढगांचे एकूण मुख्य प्रकार १० असुन त्यांचे वर्गीकरणही पुन्हा त्यांच्या ठरलेल्या आकाशस्थित उंचीच्या पातळीनुसार ३ भागात करण्यात आलेले असते.

जमिनीपासून साधारण ६५०० फुट उंचीपर्यंतचे व सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारचे ढग

i)स्ट्रॅटस -करडे, पांढरे, पातळ शीट पसरल्या सारखे, कधी सर्व आकाश व्यापलेले व पर्वतीय क्षेत्रात कधी कधी तर जमिनीवरही उतरणारे व नेहमी बुरबुरीचा पाऊस देणारे

ii) स्ट्रॅटोक्यूमुलस - गडद पण गोलाकार पण त्याचे शीटस्वरूप असलेले, सुरवातीला शांत वातावरण दाखवणारे पण पाठीमागून वादळी पाऊस घेऊन येणारे

iii)क्यूमुलस - पांढरे, अस्ताव्यस्त, खालून सपाट वरून कापसाच्या गंजासारखे असणारे पण नंतरच्या १-२ दिवसात चांगले पाऊस देऊ शकणारे

iv )क्यूमुलोनिंबस - भव्य काळे, मनोर्यासारखे व नागासारखे उभे ठाकलेले, उंचीचे, शेंड्यावर बाहेर नागाचा फणा काढल्याप्रमाणे, विसकटलेले, उष्ण, आर्द्रतायुक्त, वीजा गडगडाट सह मोठ्या थेंबाचा पाऊस देणारे

२) दुसऱ्या प्रकारचे ढग साधारण ६५००ते २०००० फुट उंची पर्यंतचे मध्यम पातळीतील तीन प्रकारचे असतात.

i)अल्टोकुमुलस- करडे, पांढरे रंगाचे, थरात, गोलाकार, घनदाट ठश्याचे, चांगल्या व आल्हादायक वातावरणात असणारे

ii)अल्टोस्ट्रॅटस- करड्या, निळसर थरातील, कधी तर पुर्ण आकाश व्यापलेले, व कधी तर सूर्याभोंवती फिंगारलेल्या स्थितीत दिसणारे. कधी सतत, लगातार झडीचा पाऊस व पर्वतीय भागात बर्फवृष्टी व पाऊस देणारे .

iii) निंबोस्ट्रॅटस - गडद, करडे, आकारहीन, पाऊस, बर्फ देणारे तसेच स्फटीकांनी भरलेले ह्यांचे थर असतात. हे तर नेहमी सूर्याला झाकतात. सतत कालावधीचा म्हणजे झडीचा पाऊस देणारे व पर्वतीय भागात बर्फ ओतणारे

३) साधारण २०००० फुट उंचीच्यावर असलेले उच्चं पातळीवरील तीन प्रकारचे ढग

i) सिरस - पक्ष्याच्या पांढऱ्या पंखाच्या समूहासारखे व फिंगरलेले दिसणारे, बर्फस्फटिकाने भरलेले असतात.

ii) सिर्रोकुमुलस- पांढरे, पातळ, कापसाच्या बँडेज सारखे असतात, उष्णकटीबंधातील अटलँटिक महासागरातील चक्रीवादळात हजे थंड व ताकदवार असतात ते हेच ढग

iii) सिर्रोस्ट्रॅटस - पुर्ण आकाश कव्हर करतात. हिवाळ्यात कधी तर २४ तासात पाऊस किंवा बर्फ पाडतात

आता ह्यामध्ये क्रमांक १ मध्ये जे सांगितलेले व जमिनीपासून साधारण ६५०० फुट उंचीपर्यंतचे व सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारच्या अलोट अश्या ढगांच्या निर्मितीसाठी सध्या आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणीय परिस्थितीच्या अभावामुळे मोसमी पाऊस व जेथे मान्सून पोहोचलाच नाही अश्या ठिकणच्या पूर्वमोसमी पावसासाठी वातावरणात जोर नाही.

अश्या वातावरण व ढगांच्या निर्मितीनंतर साधारण २१-२२ जूननंतर अथवा जून महिनाअखेरीस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते चांगल्या पावसाची अपेक्षा करू या!

-माणिकराव खुळे
हवामानतज्ज्ञ (IMD Pune )

Updated : 16 Jun 2022 2:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top