Home > मॅक्स किसान > मान्सूनवर एल-निनोचा प्रभाव; मान्सूनची ताकद कमी

मान्सूनवर एल-निनोचा प्रभाव; मान्सूनची ताकद कमी

घाटमाथ्याच्या पूर्व-पश्चिम क्षेत्रातच मुसळधार कोसळत असून मान्सूनची ( Monsoon) ताकद कमी असल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

मान्सूनवर एल-निनोचा प्रभाव; मान्सूनची ताकद कमी
X

घाटमाथ्याच्या पूर्व-पश्चिम क्षेत्रातच मुसळधार कोसळत असून मान्सूनची ताकद कमी असल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण २०० किलोमीटर रुंदीच्या घाटमाथ्यावरील पूर्व-पश्चिम पट्ट्यातच म्हणजे महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, बावडा, राधानगरी आदी परिसरातच पाऊस पाडून मान्सूनची ताकद तेथेच संपून जात असल्याचे जाणवते. मात्र त्यामुळे सह्याद्री घाटमाथा धरणक्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्या वाहू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे. तरीही पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यताही जाणवत आहे, असेही ते म्हणाले.






मान्सून मध्ये जोर नाही. घाट माथ्यापर्यंतच संथपणे साधारणच पाऊस बरसत आहे. परंतु पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याच्या तळ कोकणात मात्र सध्या मान्सून गेल्या पंधरवाड्यापासून चांगलाच कोसळत आहे. मान्सूनच्या सध्याच्या ताकदीनुसार साधारण एक ते दिड किमी. उंच असा सह्याद्री वर चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण २०० किमी. रुंदीच्या घाट माथ्यावरील पूर्व- पश्चिम पट्ट्यातच म्हणजे महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर,पोलादपूर महाबळेश्वर,बावडा, राधानगरी इ. परिसरातच पाऊस पाडून मान्सूनची ताकद सध्या तेथेच संपून जात असल्याचे जाणवते. त्याचा फायदा मात्र सह्याद्री घाटमाथा धरण क्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात जोरदार पावसामुळे नद्या वाहु लागल्या आहेत. त्यामुळे धरण जलक्षमतेची टक्केवारी नोंदण्यास सुरवात झाली आहे.

मग मान्सून ची ताकद सह्याद्री घाटमाथ्यावरच का संपून जात आहे?

सह्याद्रीच्या ह्या २०० किमी. रुंद घाटमाथ्यावरच मान्सूनच्या रेंगाळण्यामुळे पुढे सह्याद्रीचा दक्षिणोत्तर घाट उतरायला व तेथून पुढे पूर्वेकडे सरकण्यास मान्सूनला लागणारी अधिकची आवश्यक असणारी ताकद(आर्द्रतारुपी ऊर्जा व मागून नैरूक्त मान्सून वाऱ्यांचा रेटा) कमी पडत असल्यामुळे मान्सून स्वतः सह्याद्रीचा एक ते दिड किमी. उंचीचा घाट खाली उतरण्यास तयार नाही. मग ह्या मोसमी पावसाला घाटमाथ्यावरून वरच्या भागात मध्य महाराष्ट्रातील वर्षाच्छायेच्या जिल्ह्यात उतरण्यासाठी अरबी समुद्राहून त्याच्या बरोबर आलेल्या व आवश्यक लागणाऱ्या आर्द्रतेच्या ऊर्जेच्या ताकदीबरोबरच त्याला कवेत उतरून घेण्यासाठी बंगालच्या उपसागरावरून आलेली एखादी मजबूत कमी दाब क्षेत्र प्रणाली पुढे खेचण्यासाठी येण्याचीही आवश्यकता असते.

म्हणजेच सध्याच्या त्याच्या सरासरी कालावधीत नेहमी असते तशी नैसर्गिकपणे

बंगालच्या उपसागरात तयार होवून मध्य भारतात(छत्तीसगड व सीमावर्ती मध्यप्रदेश भागात )येणे आवश्यक आहे. आणि नेमकी तीच मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागराहून सध्या आलेली नाही. आणि त्याचं उत्तरही कदाचित ' एल -निनो ' तच असावं, असे वाटते.

ती प्रणाली मजबूत तयार होवून पुढे आली नाही का ? किंवा सध्या त्या ठिकाणी काय प्रणाली आहे? त्यावर माणिकराव यांनी सांगितले,त्या ठिकाणी सध्या बं. उपसागरातून हवेचा कमी दाब क्षेत्राची आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छत्तीसगड, विदर्भ,

मध्य प्रदेश कूच करणारी प्रणाली आहे, परंतु ती कमकुवत आहे. सह्याद्रीतील घाटमाथ्यावरच पडत असलेला मान्सून, मध्य महाराष्ट्राच्या वर्षाछायेच्या प्रदेशातील काही मैदानी भागात घाट उतरून घेण्यासाठी आणि मान्सून ला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. म्हणून तर सध्या केवळ घाटमाथ्यावरच किरकोळच स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्राच्या १० व मराठवाड्याच्या ३ जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण आहे पण खुपच कमी आहे. त्या प्रणालीचा कमकुवतपणा ' एल - निनो ' त आहे. हाच तो ' एल - निनो ' चा परिणाम समजावा, असे खुळे यांनी सांगितले.

ह्याच दरम्यान कदाचित 'आयओडी ' जरी मजबूत असता तरी मान्सून कोसळण्याच्या अतिउच्चं काळात कदाचित एल - निनो ला न जुमानता नक्कीच धुंव्वाधार पाऊस कदाचित आपण अनुभवला असता असे वाटते. पण तेही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या खान्देश, नाशिकपासून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पर्यंतच्या तसेच मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांच्या पश्चिमकडील संपूर्ण वर्षा छायेच्या भागात सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे.पेरणी योग्य पावसाची येथे कमतरताच सध्या येथे आपल्याला जाणवत आहे. एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणाल्यांचे अस्तित्व असुनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे. तरी देखील अधिक तीव्रतेने नसला तरी काहीसा मान्सून सध्या बरसतच आहे.

अजुनही ५-६ दिवस आपल्या हातात आहे. पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यताही जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ६ जुलैपर्यन्त किती पाऊस होतो ते बघून जमिनीत किती ओल येते ह्याचा अंदाज घेऊन मात्र ६ जुलै नंतर जेथे पुरेशी ओल साध्य झाली असेल तर तेथे योग्य वाफस्यावर तीन ते साडे तीन महिने वयाची खरीप पिकांची पेरणी करण्यास हरकत नसावी, असे खुळे यांनी सांगितले.

अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतः विवेकाच्या कसोटीवर व कृषी विभागाच्या सल्ल्यानेच घ्यावा, असेही येथे पुढे म्हणाले. जुलै ६ नंतर मात्र कदाचित महाराष्ट्रात आठ-दहा दिवस किरकोळ ते मध्यम पावसाचीच शक्यता आहे.

तेंव्हा पावसाच्या, अश्या उघड-झाप खेळीत, जशी उघडीपीची सापड मिळेल तशी, योग्य ओल व योग्य वापस्यावर पेरणी उरकावी, असे आज एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून, आवाहन माणिकराव फुले यांनी केले आहे.

जेथे पर्जन्यमान कमी असेल तेथे मात्र धूळपेरणी टाळावीच, माणिकराव खुळे यांनी शेवटी सांगितलं.

पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस पडत असला तरी अजूनही पावसाची तुट आहे.

रायगडमध्ये २२ टक्के, रत्नागिरीमध्ये ४९ टक्के तर सिंधुदुर्गात ४५ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये २८ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. मात्र उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पावसाची मोठी तूट आहे. सर्वाधिक तूट ही हिंगोली येथे ९६ टक्के नोंदली गेली आहे. नांदेड येथे ८१ टक्के, सांगली येथे ८० टक्के, सोलापूर येथे ७३ टक्के, बुलडाणा येथे ७५ टक्के, कोल्हापूर येथे ५९ टक्के, जळगाव येथे ६६ टक्के पावसाची तूट जून अखेरीस नोंदली गेली.

पेरणी कधी करावी?

"पावसाच्या उघड-झाप खेळीत, जशी उघडीपीची सापड मिळेल तशी, योग्य ओल आणि योग्य वापस्यावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकावी.जेथे पर्जन्यमान कमी असेल तेथे मात्र धूळपेरणी टाळावीच."

-माणिकराव खुळे,

जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ

भारतीय हवामान खाते,

पुणे


विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक दि. 30 जून 2023

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈

1.

कोकण घाट माथ्यावर दोन दिवस मुसळधार पाऊस सरू राहील उत्तरे कडील नाशिक धुळे अहमदनगर पश्चिम भागात जोरदार ते मध्यम पाऊस होईल





2.

"2/3 जुलै पासून राज्यात पुन्हा वळीव पावसाठी पोषक वातावरण होऊन मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा काही भागात जोरदार ते मध्यम पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल 4/5 जुलै पर्यंत सर्वत्र या प्रकार चा पाऊस सरू राहील"





3.

'जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखील जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे."





⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

4.

उत्तर महाराष्ट्र 30 जून

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल

जळगाव संभाजी नगर अहमदनगर नाशिक भागात पाऊस 1/2/3/4 जुलै जळगाव धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र वळिव पावसाचा जोर वाढेल नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार घाट माथायावर तीव्र पाऊस होईल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️






5.

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर 30 जून पासून मुसळधार ते काही भागात 70mm 80 mm हुन अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 2/3/4/5 जुलै पर्यंत पाऊस सुरु राहील

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️





6.

मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल तसेच 30/1 जुलै या भागात जोरदार पाऊस होईल 2/3/4/5 जुलै पाऊस वळिव सरी भागात पडेल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️





7.

मराठवाडा 30 जून पुढील दोन दिवस लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धाराशिव ढगाळ वातावरण राहून वळिव सरी चा पाऊस काही भागात जोरदार वळिव पाऊस होईल 30/1 तारखेला पर्यंत काही भागात किरकोळ राहील 2 /3/4/5 जुलै अनेक भागात मेघगरजने सह जोरदार पाऊस वाढलेला राहील

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️





8.

विदर्भ 30 जून

पूर्व विदर्भ नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाना वाशीम अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला 28 ते 30पूर्व विदर्भ पाऊस काही भागात होईल 30 जून पाऊचा जोर वाढलेला राहील जुलै संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता 2/3/4/5 जुलै वळिव मेघगरजने सह पावसाला सुरवात होईल.




हे हि पहा...


Updated : 1 July 2023 5:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top