Home > मॅक्स किसान > Monsoon2023 पाऊस पुन्हा राज्यभर सक्रिय

Monsoon2023 पाऊस पुन्हा राज्यभर सक्रिय

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून येत्या आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Monsoon2023 पाऊस पुन्हा राज्यभर सक्रिय
X

ल्या दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका आहे तर काही ठिकाणी नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांमध्ये महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील काही भागात तीव्र पावसाच्या सरी बरसतील. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि उत्तर विदर्भात पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर पश्चिम मराठवाड्यातील काही भाग घाटाजवळ आणि ऐन मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, पुण्यालाही पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

कोकणात पावसाचा रेड अलर्ट...

कोकणासोबतच विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या अजूनही १७ टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे या आठवड्यातल्या पावसाकडे अधिक लक्ष आहे. कोकणात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये भारतीय हवामान विभागाने रेड अॅलर्टही जारी केला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈

1.

18/19 जुलै ला निर्माण झालेली चक्राकार परिस्थिती विदर्भा मराठवाड्या पर्यंतच पाऊस देऊन कमजोर होऊन मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र या भागातून पुढे सरकत आहे.




2

आज बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमीदाबाचा पट्टा तयार होणार असून याचा मोठा परिणाम विदर्भ आणि मराठवाडा विभागात होणार असून 21/22/23/24 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस होईल.



3.

उत्तर महाराष्ट्रतील काही भागात देखील याचा प्रभाव जाणवेल. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या भागात वातावरण पोषक नसल्याने काही भागात पाऊस कमी प्रमाणात आहे. मात्र कमी दाब तीव्रता वाढून बाष्प युक्त वाऱ्याचा प्रभाव वाढला तर या भागात देखील काही ठिकाणी चांगला पाऊस होईल.




4

ऑगस्ट मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. ऑगस्ट एल निनो तीव्र होणार आहे. तसेच हिंदी महासागरावर iod देखील पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे.




⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5

उत्तर महाराष्ट्र 12 जुलै

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव,संभाजी नगर, अहमदनगर, नाशिक, भागात पाऊस जळगाव, धुळे, संपूर्ण नाशिक,अहमदनगर, धुळे, नंदुरबार सर्वत्र मध्यम पाऊस पडेल. 21/22/23 जुलै नंतर हळूहळू काही पाऊसात वाढ होण्याची शक्यता आहे.


6.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

६. कोकण

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर पासून काही भागात कमी अधिक पाऊस पाऊस होईल 20ते 25 जुलै मुसळधार पाऊस होईल.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

7.

मध्य महाराष्ट्र

पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल. तसेच 20 जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल 22/23 जुलै पाऊस या भागात देखिल वाढेल पुढील पाऊस वाढेल.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

8.

मराठवाडा

20 जुलै पुढील दोन दिवस लातूर,नांदेड, हिंगोली,परभणी, जालना, बीड, धाराशिव ढगाळ वातावरण राहून किरकोळ सरी काही भागात होतील. किरकोळ राहील 22/23आणि 25ते 28 जुलै काही भागात पाऊस वाढलेला राहील.




⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

9.

विदर्भ 20 जुलै

पूर्व विदर्भ, नागपूर,गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला बुलढाणा, वाशीम काही ठिकाणी पाऊस होईल. 21/22/23 जुलै विदर्भात पावसात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.





Updated : 20 July 2023 5:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top