Home > मॅक्स किसान > कांद्यावर मोदी सरकारचा पुन्हा हातोडा

कांद्यावर मोदी सरकारचा पुन्हा हातोडा

आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान करत कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्याचा शेतकरी विरोध निर्णय घेतला आहे त्यामुळे काही प्रमाणात भाव नियंत्रित होतील परंतु शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक देशभर दिसत आहे.

कांद्यावर मोदी सरकारचा पुन्हा हातोडा
X

काल अचानकपणे अधिसूचना काढत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे कांदा निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे.




कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

केंद्र सरकारच्या या आत्मघाती निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेले काही दिवस टोमॅटो दरवाढीने सरकार हैरान झाले होते.टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर देशातंर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे.

बाजारात कांद्यांचे दर 30 ते 40 रुपये किलोच्या घरात आहेत. सरकारकडून काही दिवसांआधीच किंमती पाडण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणण्यात आला होता. देशात कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याने चांगल्या प्रतीचा कांदा महाग झाला आहे.

निकृष्ट दर्जाच्या कांदा, सोबतच इतर भाज्यांचे दरवाढ कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी 40 टक्क्यांच्या जवळपास उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेण्यात येते.

निर्यातीबाबत सरकार निर्णय घेण्याचा होता अंदाज

सप्टेंबरपासून कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात होऊन सर्वसामान्यांना महागाईचे नवे धक्के बसतील, अशी चर्चा होती. ही भीती लक्षात घेऊन सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यासाठी उपाययोजना करू शकते, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.

कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंधामुळे देशांतर्गत बाजारपेठेत त्याची उपलब्धता कायम राहण्यास मदत होईल. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता असल्याने कांद्याचे दर नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कमी होईल. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, सरकार बफर स्टॉकमधून कांदा उतरवणार आहे.

मे महिन्यानंतर महागाईत वाढ

टोमॅटो, भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमतीत वधारल्याने मे महिन्यानंतर पुन्हा महागाई वाढू लागली. जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर अनेक महिन्यांनंतर 7 टक्क्यांच्या पुढे गेला होता. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने आपल्या बुलेटिनमध्ये सप्टेंबर तिमाहीत किरकोळ चलनवाढ 6 टक्क्यांपेक्षा जास्त राहू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आरबीआयने महागाईसाठी सहनशीलता दर हा 6 टक्के इतका ठेवला आहे.

सुमारे वर्षभरापासून दर ढासळल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीस आले होते. आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याची चिन्हे असतानाच कांद्याची देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर केंद्राने तब्बल ४० टक्के शुल्क लागू केले आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हे निर्यातशुल्क लागू असणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात दि. १ एप्रिल ते दि. ४ ऑगस्ट या कालावधीत देशातून सुमारे पावणेदहा लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. यात प्रामुख्याने बांग्लादेश, मलेशिया आणि यूएई या देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली. या निर्यातीमध्ये नाशिक जिल्ह्याचाही मोठा वाटा आहे. ग्राहक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार शनिवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत ३०.७२ रुपये प्रति किलो होती. राजधानी दिल्लीमध्ये कांद्याचा दर प्रतिकिलोसाठी ३७ ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खरीप हंगामात सध्या कांद्याची आवक मर्यादीत असल्याने कांद्याच्या भावात काहीशी वाढ होत आहे.

कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्कचा निर्णय तुघलकी आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात व राज्यात रेल रोको, रास्ता रोको आंदोलन करण्याबरोबरच आमदार, खासदार, मंत्री यांना मतदार संघात फिरू दिले जाणार नाही.

- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

पुरवठा कमी आहे तर कुणीही काहीही करा, किंमत वाढणारच. फक्त संयम ठेवून पुरवठा नियंत्रित करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे समाज माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा करून लोकांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी दाखवून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल. भाववाढीला प्रत्यक्ष ग्राहक फार विरोध करत नसतो. चॅनलस melodramatic कवरेज करते आणि धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले जाते. म्हणून आपापली मते न सांगता विक्री प्रक्रियेत संधि शोधण्यावर लक्ष केंद्रित करावे.

श्रीकांत कुवळेकर, कृषी विश्लेषक

Updated : 20 Aug 2023 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top