Home > मॅक्स किसान > नितीन गडकरी - बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

नितीन गडकरी - बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षमेतवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट आव्हान दिले आहे.

नितीन गडकरी - बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
X

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर पुन्हा एकदा अमरावतीत कृषी विद्यापीठांवर निशाणा साधला आहे. "आपल्याला शेतीमध्ये एकरी ५ क्विंटलच्यावर सोयाबीन झालं नाही, तुम्ही हे करत असाल तर सांगा नाही, तर तुमचा उपयोग काय?" असा थेट सवालच गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना विचारला आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे आव्हानही त्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढणार हे आम्हाला सांगा, असे आवाहनही त्यंनी कृषी विद्यापीठांना केले आहे.

अमरावतीमध्ये अपेडा आणि ऍग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीच्या संधी या विषयावरील शिबिरात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडे वळणं सध्या गरजेच आहे. यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे गरजेचे असून यातून एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे, तरच शेतकरी यशस्वी बनू शकतो असा सल्लाही त्यांनी दिली.

शेती करताना उत्पादन खर्च कमी आणि व्हॅल्यूएडिशन करणे त्यासोबतच उत्तम पॅकेजिंग करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले, त्यासाठी निसर्गाच्या बदलत्या चक्रामध्ये मार्गदर्शन घेऊन शेती केल्यास शेती उत्तम ठरू शकते, त्याचबरोबर शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करणे गरजेचे आहे, असाही सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

Updated : 18 July 2022 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top