Home > मॅक्स किसान > SEBI मुंबईत दणाणला शेतकऱ्यांचा आवाज : वायदेबंदीला विरोध

SEBI मुंबईत दणाणला शेतकऱ्यांचा आवाज : वायदेबंदीला विरोध

SEBI मुंबईत दणाणला शेतकऱ्यांचा आवाज : वायदेबंदीला विरोध
X

सेबी अर्थात "सिक्युरिटीज एन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया" म्हणजे भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडीने शेतीमालाच्या वायदेबाजावर घातलेल्या बंदी विरोधात स्वतंत्र भारत पार्टी (Swatantra Bharat Paksh) आक्रमक होऊन आज मुंबईतील सेबी (SEBI) कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.

यावेळी बहुसंख्येनं शेतकऱ्यांना अटक करुन सोडून देण्यात आलं. आंदोलनाला अनेक संघटना पाठिंबा देत असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली होती. शेतीमालावर घातलेल्या वायदेबंदीला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते असे अनिल घनवट म्हणाले.

वायदेबाजावर बंदी घातल्यामुळं शेतीमालाचे भाव पडले

सन 2022 मध्ये अनेक शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यापारावर सेबीने बंदी घातली होती. डिसेंबरमध्ये ही मुदत संपणार होती. नवीन वर्षात शेतीमालाचे वायदे सुरु होतील अशी अपेक्षा होती. मात्र, सेबीने गहू, तांदूळ, चना, मूग, सोयाबीन तसेच त्याचे उपपदार्थ, मोहरी आणि त्याचे उपपदार्थ पमतेल या शेतीमलांवरील वायदेबंदीस डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे घनवट म्हणाले.

महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी

स्वतंत्र भारत पार्टीने वायदेबंदी मागे घेण्याची सेबीला विनंती केली होती. मात्र, एक महिना झाला तरीही सेबीने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळं आंदोलन केलं आहे. आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी हिताच्या आहेत. त्या मान्य असल्यामुळं शेतकरी संघटना (शरद जोशी), शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील), किसानपुत्र आंदोलन, तसेच अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे घनवट म्हणाले. महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी आज 23 जानेवारीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले होते.

रब्बी हंगामातीला पिकांना फटका

हंगामात पिकलेला शेतीमाल बाजारात येण्यास आता सुरुवात होईल. त्याच्या आगोदर सेबीने वायदेबाजार बंदी उठवावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीनं केली होती. कारण बायदेबाजार बंदी उठवली नाही तर रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जर बंदी उठवली नाही तर सेबीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर, स्वतंत्र भारत पार्टीच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व्यापारी, आयातदार तसेच वायदेबाजाराशी संबंधित सर्वांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचा इशारा घनवटांनी दिला होता. त्याप्रमाणे आता 23 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे.

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैर-वैधानिक संस्था म्हणून केली गेली. १२ एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा १९९२ संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या व्यवसाय जिल्ह्यात सेबीचे मुख्यालय असून नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रीय कार्यालये आहेत. जयपूर आणि बेंगळुरू येथे स्थानिक कार्यालये उघडली गेली आहेत आणि वित्तीय वर्ष २०१३-२०१४ मध्ये गुवाहाटी, भुवनेश्वर, पटना, कोची आणि चंदीगड येथे कार्यालये देखील उघडली आहेत.अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत. जी महालिंगम , माधबी पुरी बूच , एसके मोहंती ,अनंत बरुआ हे सध्या पूर्णवेळ सदस्य आहेत.


सेबीची उद्दिष्टे

कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(शेअर्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.

गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.

सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे.

रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.

सेबीची कार्यपद्धती -

१) सेबी तीन घटकांसाठी काम करीत असते

अ) प्रतिभूती निर्गमक

ब) गुंतवणूकदार

क) बाजारातील मध्यस्थ आणि बाजार

सेबीची महत्त्वाची कार्ये

कार्ये

कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सेबीला खालील अधिकार सोपविण्यात आले आहेत:

१. सिक्युरिटीज एक्सचेंजच्या कायद्यांद्वारे मंजूर करणे.

२. सिक्युरिटीज एक्सचेंजला त्यांच्या कायद्यांद्वारे दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

३. खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करा आणि मान्यताप्राप्त सिक्युरिटीज एक्सचेंजमधून नियमित परतावा मागवणे .

४. आर्थिक मध्यस्थांच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करा.

५. विशिष्ट कंपन्यांना एक किंवा अधिक सिक्युरिटीज एक्सचेंजमध्ये त्यांचे समभाग सूचीबद्ध करण्यास भाग पाडणे.

६. ब्रोकर आणि सब-ब्रोकरची नोंदणी

७. कार्यकारी प्रमुख म्हणून सेबी गैरव्यवहारांची तपासणी आणि त्यावर कारवाई करते.

८. कायदेपालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा सेबीला अधिकार देण्यात आला आहे.

९. न्यायालयीन प्रमुख म्हणुन घोषणा ,नियम,आदेश काढण्याचा सेबीला अधिकार आहे .

Updated : 24 Jan 2023 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top