Home > मॅक्स किसान > कोकणातील आपत्तीचे व्यवस्थापन करणार: राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

कोकणातील आपत्तीचे व्यवस्थापन करणार: राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

वातावरणीय बदलांमुळे दरवर्षी कोकणपट्टीत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कोकणामध्ये सव्वातीन हजार कोटी रुपये खर्चून“कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कोकणातील आपत्तीचे व्यवस्थापन करणार: राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
X


तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळाने गेल्या सलग दोन वर्ष कोकणपट्टीचे अपरिमित नुकसान केले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा पासूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मध्ये मोठ्या प्रमाणात कोकणाच्या आपत्तीवरून आरोप-प्रत्यारोप झाले होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.

या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती राज्‍य सरकार करणार आहे. त्यासाठी होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च केला जाणार आहे.

दरवर्षी वाढत चाललेल्या कोकणातील आपत्तीला हा कार्यक्रम किती पुरा पडेल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

Updated : 15 Sep 2021 4:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top