कर्नाटक प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान द्या: सत्यजीत देशमुख

24

महाराष्ट्रात सध्या दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. लॉकडाऊन मुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावानं दूध विकावं लागत आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी नेते सत्यजीत देशमुख यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावर कोण कोणते उपाय करता येतील. यावर भाष्य केलं.

यावेळी सत्यजीत देशमुख यांनी महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील कर्नाटक राज्याप्रमाणे थेट 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. तसंच दूध भुकटी साठी शासनाने प्रयत्न करावे. अन्यथा मोठा प्रश्न निर्माण होईल.

 

दुधाला शाश्वत भाव नाही. पशुखाद्याचे भाव वाढत आहेत. तर दुसरी कडे दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्ण पणे संकट ग्रस्त आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था जर चाक चालवायचं असेल तर सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेचा व्याप / परिघ वाढवायला हवा. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

दुधउत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. शेतमजूराला शाश्वत अशी व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. जर त्यांच्या हाता मध्ये पैसा खेळला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहिल. जर ग्रामीण भागातील शेतकरी कोलमडला तर ग्रामीण अर्थव्यवस्था देखील कोलमडेल. बोगस बियाणे या सारखे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यावर सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. जर ग्रामीण अर्थव्यवस्था कणा उभा करायचा असेल तर, कोरोनाच्या या संकट काळामध्ये शेतकऱ्याला उभ करायचं असेल तर बाजारपेठ परत एकदा खुली करावी लागेल. अशी मागणी सत्यजीत देशमुख यांनी केली आहे.

Comments