Home > मॅक्स किसान > आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे रघुराम राजन यांना पत्र

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे रघुराम राजन यांना पत्र

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे रघुराम राजन यांना पत्र
X

भारतातील चुकीच्या अर्थशास्त्राच्या संकल्पनेमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे रघुराम राजन अर्थतज्ञ यांना पत्र...

आदरणीय रघुराम राजन जी… आपल्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाला सलाम, आपण निवडणूक आयोगाला शेतकरी कर्जमाफी हे आश्वासन जाहीरनाम्यात घेता येणार नाही व त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो असा सल्ला दिला आहे, या देशातील लाखो शेतकरी आपल्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आत्महत्या करित आहेत याचा अभ्यास आपण कधी केला का?का या देशातील बुद्धिवंतांना शेतकरी हा आपला गुलाम वाटतो.

साहेब गेल्या ७० वर्षात सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतन आयोगामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे आपण कधी लिहले नाही हो. देशातील कर दात्यांकडून जमा होणारा६५% कर हा वेतनावर खर्च होतो व गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रासारख्या राज्याने चक्क पगारासाठी कर्ज काढले तरी वर्षाला १६०००कोटी वाढ देणारा नवीन वेतन आयोग लागू होतो आहे हे आपण बिनबोभाट उघड्या डोळयांनी पहात असतांना त्यावर बोलण्याचे धाडस का करीत नाहीत? कधीतरी लिहा.

आपणास आणखी एक विनंती करतो सरकारला हे ही सांगा गरिबांना धान्य फुकट जरूर वाटा ते जाहीरनाम्यात घ्या पण शेतकऱ्यांना आधी उत्पादन खर्च वर आधारित भाव द्या,मग खरेदी करा मग फुकट वाटा आपल्या सरकारचे अर्थ धोरणासाठी शेतकऱ्यांचा बळी देणं पाप आहे.

भारतातील शेतकरी हा जागतिक बाजारपेठेत त्याचा माल विकून तुमची व त्याची दोघांची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यास सक्षम आहे. फक्त जमल तर हे ही सांगा की जागतिक बाजारपेठेत रासायनिक खते व डिझेल यांच्या किमती गेल्या कित्येक वर्षात कमी नाही झाल्या तर कोसळल्या पण भारतात सरकारच्या आशीर्वादाने चार पट वाढल्या व रात्रीची वीज जगभर फुकट मिळते पण येथील शेतकऱ्यांना औद्योगिक सह घरगुती चोरीची सगळी रक्कम त्याच्या नावावर बील देऊन खपवणे तेव्हढे बंद करा.आणि हो तुमचे सरकार व अधिकारी फार सज्जन आहेत तरी पण कधीतरी जगभर बॅन असलेले कीटकनाशके भारतातील शेतकऱ्यांना चार ते पाच पट नफा कमवून देणात तवढे बंद करून देशातील लोकांना कॅन्सर पासून वाचवणे होईल व जगातील स्वस्त कीटकनाशके शेतकरी यांना कसे मिळतील हे हि बघा.

आणि हो तुमच्या राजकारण्यांना हे ही सांगा शेतकऱ्यांना मारण्याच्या नादात पाकिस्तान,चीन ह्या देशातील गेल्या पाच वर्षातील निर्यात कमी करून आयात वाढवली व शत्रू राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यास मदत करतात ते बंद करा, व व्यापाऱयांना निवडणुक काळात शेतमाल हा याच्या वरखरेदी करू नका नाहीतर धाडी टाकू असा दम देऊन बाजार पडणे बंद करण्याचा सल्ला देखील द्या, आणि हो जमलं तर उद्योगांचे बुडालेले कर्ज माफ करण्यास विरोध करा म्हणजे मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी, चोक्सी सारखे पळून जाणार नाहीत परंतु मला माहित आहे आपण ते सांगण्याचे धाडस करू शकणार नाहीत कारण तुमच्या सारखे बुद्धीवन्त यांनी कधीच शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही व घेणार ही नाहीत.

मात्र मी आपणास नक्की सल्ला देतो या देशातील शेतकरी जगला तर देश जगेल व तरच तुमची अर्थव्यवस्था टिकेल पाहिजे तर इंग्रजांचा सल्ला घ्या.

धन्यवाद ,आपणास खूप खूप वाईट वाटले असेल माफी असावी परंतु आम्ही आत्महत्या का करतो? याचा विचार न करणारे भारतातले अर्थशास्त्रज्ञ हे योग्य न्याय करणारे नाहीत हे माझे स्पष्ट मत आहे.

या देशातील व्यवस्थेने लुटलेला शेतकरी🙏

एस बी नानापाटील

Updated : 16 Dec 2018 6:13 AM GMT
Next Story
Share it
Top