पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त
 X
X
भात शेती ही मुबलक पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे. परंतु सध्या कोकणामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे ह्या भात शेतीचे नुकसान होण्याची संभावना दिसून येत आहे. पारंपारिक व आधुनिक पद्धतीने केली जाणारी ही भात शेतीची मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून या शेतीची निगा शेतकरी राजा घेत असतो. त्यानंतर पावसाळ्यामध्ये लावणी योग्य झालेली रोपे, पीक धारणेसाठी पावसावर अवलंबून असतात. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये पावसाने पूर्णपणे कोकणाकडे पाठ वळविल्याचे दिसून येत आहे. अधून मधून पडणाऱ्या सरी ह्या तितक्याशा पुरेशा नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. प्रखर उन्हामुळे पीक धारणेसाठी तयार झालेली रोपे करपण्याची शक्यता आहे. सध्या या पिकांच्या वाढीसाठी छोट्या- छोट्या पाटांच्या आधारे पाणीपुरवठा शेतकरी करत आहे. एकंदरीत अशीच परिस्थिती राहिली तर शेती करायची की नाही? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे असल्याचे येथील शेतकरी संजय वाडेकर यांनी सांगितले.
















