Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रात पारंपारीक खेळांची अनोखी संस्कृती..

महाराष्ट्रात पारंपारीक खेळांची अनोखी संस्कृती..

महाराष्ट्रात पारंपारीक खेळांची अनोखी संस्कृती..
X

महाराष्ट्रात पारंपारीक खेळांची अनोखी संस्कृती आहे. लोक ज्या प्रदेशात राहतात त्यानुसार त्या ठिकाणचे वेगवेगळे खेळ आढळतात. यामध्ये मनोरंजनासाठी प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) बैलगाड्यांच्या शर्यती प्रसिद्ध आहेत.

विदर्भातील काही भागात तर चक्क कोंबड्यांच्या झुंजी होतात. तेथे पहिल्यांदा बैलगाड्यांच्याही शर्यती होत असत. या भागात बैलैच्या शर्यतीस शंकर पट या नावाने ओळखले जाते. शेतकरी आणि बैल यांचा रोजचाच संबंध असतो. त्यामुळे त्यांच्या करमणुकीच्या साधनात सुध्दा बैलगाड्यांच्या शर्यती येऊ लागल्या.

पावसाचा हाहाकार; शेतकऱ्यांनी साजरी केली नाही दिवाळी

आधार कार्ड खर्चाची माहिती सरकारकडे नाही

सांगली जिल्ह्यातील आटपाडी भागात मोठ्या प्रमाणात धनगर समाज राहतो. मेंढीपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. मेंढ्या चारण्यासाठी जो मेंढ्यामागे जातो त्यास मेंढका असे म्हटले जाते. मेंढ्यांचे मोठमोठे कळप सांभाळण्यासाठी मेंढ्यांना एक प्रकारे शिस्त आवश्यक असते. मेंढक्याकडे मेंढ्यांना बोलवण्याची, त्यांना विशिष्ट प्रकारच्या आवाजात बोलावण्याची कला असते.

अनेक किमी अंतरावरून केवळ शिट्या वाजवून किंवा विशिष्ट प्रकारे ओरडून चुकलेल्या मेंढ्या मालकाकडे येतात. ही एक प्रकारची कलाच आहे आणि या भागात दूर अंतरावरून मेंढ्यांना बोलवण्याच्या स्पर्धेची संस्कृती आजही जपली जातेय.

शेंडगे वाडी या गावात अनेक वर्षांपासून मेंढ्या बोलावण्याची स्पर्धा भरते.

कशी असते 'ही' स्पर्धा...

साधारण दीड किमी अंतरावर एका ठिकाणी रेषा मारली जाते. त्या रेषेपासून मेंढ्यांचे वीस वीस चे कळप उभे केले जातात. त्यांचा मालक अलीकडे रेषेवर उभा असतो. लाल झेंडा पाडला जातो. रेषेवरील मेंढ्या न दिसणाऱ्या दीड किमीच्या अंतरावर असतात. केवळ ओरडून शिट्या मारून मेंढका आपल्या मेंढ्यांना बोलवतो. झेंडा पडताच मेंढके शिट्या आणि किंकाळ्या फोडतात.

दूरवर शेवटच्या टोकाला काही दिसत नाही. मेंढक्यांचा आवाज चढत जातो. तसं काही मिनिटात शेवटच्या टोकावर रंगीत टिपक्याची अस्पष्ट ओळ दिसू लागते. ती गतीने मेंढक्याच्या दिशेने येऊ लागते आणि क्षणात सर्व मेंढ्या आपल्या मेंढक्याकडे झेपावत पोहचतात. त्याचे टाईम मोजले जाते. असे स्पर्धेत वेगवेगळे गट सोडले जातात. ज्या गटाच्या मेंढ्या कमी वेळेत पोहचतात तो विजयी ठरतो.

या चित्तथरारक स्पर्धेला धनगर (Dhangar) समाजामध्ये मोठी परंपरा आहे. शेंडगे वाडी येथे या स्पर्धा आज पार पडल्या. यासाठी परिसरातील मेंढपाळांनी मोठी गर्दी केली. प्राणी आणि माणूस यांच्या संवादाचा हा व्हिडिओ जरूर पहा.

https://youtu.be/xH-mxAsjrU4?t=9

Updated : 31 Oct 2019 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top