Home > मॅक्स किसान > राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; हवामान विभागाचा अंदाज
X

राज्यभरात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार होत आहेत.या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यासह नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातही दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने दडी मारली आहे. पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

हवामान अभ्यासक विजय जायभाये यांनी राज्याचा विभागनिहाय वर्तवलेला अंदाज...

ता. सिन्नर जि. नाशिक दि.6 सप्टेंबर 2023

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈⛈️⛈️⛈⛈️

1.

कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरावर कमी दाबचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा प्रवास मध्य भारतात होईल मागील महन्याच्या शेवटी आपण अंदाज दिले होते कि 4/5 सप्टेंबर पर्यंत तरी खूप मोठ्या पावसाची शक्यता राज्यात जास्त भागात दिसत नाही.



2.

विदर्भात मुसळधार

आज 6 सप्टेंबर पासून मात्र विदर्भात जोरदार ते मुसळधार पाऊस सरू होईल 7/8 सप्टेंबर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, जळगाव,धुळे, नंदुरबार या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर मध्यम पाऊस काही भागात होईल. एक दोन ठिकाणीच जोरदार सरी होतील राज्यात इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

3.

हिंदी महासागरावर IOD पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये आला असून MJO देखिल 3/4/5 फेज मध्ये सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागराव कमी दाबाचे पट्टे पुढील दोन तीन आठवडे सतत निर्माण होतील आणि मध्य भारतात मात्र विदर्भ मराठवाडा विभागात आणि मध्य प्रदेश छतीसगड उदीसा तेलगंणा या राज्यात चांगला पाऊस 18/19 सप्टेंबर पर्यंत होईल.



4.

मान्सून राजस्थानातून परत फिरणार

20/22 सप्टेंबर नंत्तर मान्सून राजस्थान मधून माघारी फिरण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस राज्यात काही भागात होईल काही भागात कमी प्रमाणात राहील.




⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5. उत्तर महाराष्ट्रात मध्यम

उत्तर महाराष्ट्र 6 सप्टेंबर

आज पासून जळगाव, धुळे, नंदुरबार काही भागात मध्यम पाऊस होईल नाशिक अहमदनगर भागात मध्यम पाऊस होईल इतर ठिकाणी सर्वत्र ढगाळ हवामान किरकोळ पाऊस होईल संभाजी नगर किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल.



6. मोठा पाऊस नाही

7/8 सर्व भागात मध्यम पाऊस होईल खूप मोठ्या पावसाची शक्यता नसली तरी काही भागात मध्यम पाऊस पिकांना जीवदान ठरेल 15/18 सप्टेंबर काही भागात पावसाचा जोर राहील 21/22 सप्टेंबर नंत्तर स्थानिक वातावरण होऊन मेघगर्जजने सह पाऊस होईल.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

7

कोकणात जोरदार पाऊस

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल .



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

८.मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस

मध्य महाराष्ट्र 6 सप्टेंबर पुढील तीन दिवस पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली काही भागात मध्यम पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलका पाऊस होईल पुढील आठवड्यात पासून पुढील काही दिवस पाऊस पडेल .


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

9. मराठवाड्यात जोरदार पाऊस

मराठवाडा 6 सप्टेंबर पुढील दोन दिवस6/7सप्टेंबर पूर्व मराठवाड्यात लातूर, नांदेड,हिंगोली, परभणी, जालना, बीड,धाराशिव काही भागात जोरदार वळीव पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस होईल. 8/9 सप्टेंबर देखील पाऊस जोरदार राहील.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

10.विदर्भात मुसळधार

विदर्भ 6 सप्टेंबर

आज पूर्व विदर्भ, नागपूर, गोंदिया, वर्धा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाना,अकोला मध्यम पाऊस होईल 6 सप्टेंबर मध्यम ते जोरदार पाऊस होईल 7/8 सप्टेंबर काही भागात मुसळधार पाऊस होईल त्या नंतर 11ते 17 सप्टेंबर पाऊस चांगला राहील.





Updated : 6 Sep 2023 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top