Home > मॅक्स किसान > आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करू ; रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करू ; रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

16 जूनला मुंबई येथील एआयसी कार्यालयाच्या 20 व्या मजल्यावरून किंवा बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बिल्डिंग वरून उड्या घेऊन हजारो शेतकऱ्यांसह आत्महत्या करू , असा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पोलिसांनी कितीही नोटीस बजावल्या तरी रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे..

आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करू ; रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस
X

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुंबई येथील एआयसी कार्यालयाच्या 20 व्या मजल्यावरून किंवा बुलढाणा येथील कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बिल्डिंग वरून उड्या घेऊन हजारो शेतकऱ्यांसह आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलन कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा या नोटीसांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना देण्यात आला आहे. पीक विम्याच्या रकमा, अतिवृष्टीची मदत, पीक कर्ज, शेतमालाला भाव यासह काही मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी राज्य सरकारला 15 जून पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. 15 जून पर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही , तर 16 जूनला मुंबई येथील एआयसी कार्यालयाच्या 20 व्या मजल्यावरून किंवा बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बिल्डिंग वरून उड्या घेऊन हजारो शेतकऱ्यांसह आत्महत्या करू , असा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पोलिसांनी कितीही नोटीस बजावल्या तरी रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.


Updated : 12 Jun 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top