Home > मॅक्स किसान > 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागांमध्ये जोरदार बरसणार

5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागांमध्ये जोरदार बरसणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहेत. अशातच आता पुढील आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागांमध्ये जोरदार बरसणार
X

पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल.

मुंबईसह कोकण व विदर्भातील (७+११) अश्या १८ जिल्ह्यात तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता

पुढील आठवडाभर कायम


असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.उर्वरित मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील नांदेड वगळता ७ जिल्ह्यात अश्या एकूण १७ जिल्ह्यात पुढील आठवडाभर केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे.

पावसासाठी अरबी समुद्रातील तटीय आस व्यतिरिक्त सर्व प्रणाल्या आघाडीवर असुनही पावसाची गैरहजेरी खरं तर मान्सून पावसाच्या भाकिताची संधीग्धता वाढवत आहे, असे माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल.पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय मुंबई आणि ठाण्यातही यलो अलर्ट असून इथे मुसळधार पाऊस बरसेल.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक दि. 24

जुलै 2023

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈⛈️⛈️⛈️⛈️

1.




बंगालच्या उपसागरावर पुन्हा तीव्र कमी दाब निर्माण होऊन पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तसेच मराठवाड्यात हिंगोली नांदेड लातूर परभणी चे काही भाग मुसळधार पाऊस 25/26/27 जुलै होईल.

2




विदर्भाचा उर्वरित भाग आणि मराठवाड्यात काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम पाऊस होईल सोलापूर सांगली धराशिव आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्यम पाऊस राहील कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस सरूच राहील.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

3




ऑगस्ट मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार आहे तसेच हिंदी महासागरावर iod देखिल पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

4




उत्तर महाराष्ट्र 24 जुलै

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव संभाजी नगर अहमदनगर नाशिक काही भागात पाऊस होईल जळगाव धुळे संपूर्ण नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार सर्वत्र मध्यम पाऊस पडेल 25/26/27 जुलै काही पाऊस होण्याची शक्यता आहे .

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️





कोकण

सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर पासून काही भागात कमी अधिक पाऊस पाऊस होईल 25/26/27 जुलै मुसळधार पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

मध्य महाराष्ट्र





24 पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पाऊस पडेल तसेच जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल 26/27 जुलै या भागात पावसाचा जोर काही भागात वाढेल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️





मराठवाडा

24 जुलै पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धाराशिव काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिमुसळधार पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

विदर्भ 24 जुलै





पूर्व विदर्भ 25 जुलै नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाना वाशीम काही ठिकाणी पाऊस होईल 26 /27जुलै विदर्भात पावसात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

1.




मुंबईसह कोकण व विदर्भातील (७+११) अश्या १८ जिल्ह्यात तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता

पुढील आठवडाभर कायम

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune. 👆

2.




उर्वरित मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील नांदेड वगळता ७ जिल्ह्यात अश्या एकूण १७ जिल्ह्यात पुढील आठवडाभर केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे.

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.

Updated : 24 July 2023 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top