Home > मॅक्स किसान > Monsson 2023 मान्सून एक आठवडा आधीच देशभर पोचला

Monsson 2023 मान्सून एक आठवडा आधीच देशभर पोचला

दरवर्षी ६ जुलैला देशभर पोचणारा मान्सून यंदा २ जुलैला म्हणजेच एक आठवडा आधीच देशभर पोचला आहे..

Monsson 2023 मान्सून एक आठवडा आधीच देशभर पोचला
X

मान्सूनच्या वातावरण प्रणालीत बदल झाला असून पुढील चार दिवस राज्यातील अंतर्गत भागात पश्चिमे कडून आणि पूर्वे कडून बाष्प मोठ्या प्रमाणात येणार असल्याने राज्याच्या अंतर्गत भागात पुढील तीन चार दिवसात काही भागात जोरदार ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज विजय जायभावे यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात असलेली गुजरात लगतची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य भागात सरकली असून या परिस्थिती मुळे राज्यात अरबी समुद्रातील बाष्पाचा पुरवठा अधिक तीव्र होणार आहे. तसेच बंगालाच्या उपसागरावर देखील आंध्र प्रदेश ओडीसा लगत पुढील दोन दिवस तीव्र हवामान प्रणाली निर्माण होऊन उत्तर वायव्य कडे प्रवास करणार आहे.या सर्व हवामान प्रणाल्यामुळे राज्यातील अंतर्गत भागात पश्चिमे कडून आणि पूर्वे कडून बाष्प मोठ्या प्रमाणात येणार आहे, असे ते म्हणाले.पुढील तीन दिवसात मध्य महाराष्ट्र अहमदनगर पुणे सोलापूर सांगली नाशिक पूर्व भाग जळगाव छत्रपती संभाजी नगर संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात काळेकुट्ट ढग निर्माण होऊन काही भागात मुसळधार तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.तुरळक भागात मध्यम पाऊस देखील होईल 7/8 जुलै पर्यंत राज्यात अनेक भागात पाऊस अपेक्षित आहे.



2.

जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर IOD देखील जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️


3.उत्तर महाराष्ट्र 2 जुलै

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर काही भागात मध्यम ते ते जोरदार पाऊस होईल.

जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक भागात पाऊस 3/4/5 जुलै जळगाव, धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र वळीव पावसाचा जोर वाढेल. नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार सर्वत्र 8/9 जुलै पर्यंत पाऊस पडेल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




4. कोकण 2 जुलै

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर पासून काही भागातकमी अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 3/4/5 जुलै पर्यंत पाऊस सुरु राहील

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️



5. मध्य महाराष्ट्र 2 जुलै

मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल तसेच 2 जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल 3/4/5 जुलै पाऊस वळिव सरी या भागात देखिल होतील

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️



6.मराठवाडा 2 जुलै

पुढील दोन दिवस लातूर, नांदेड,हिंगोली परभणी, जालना, बीड, धाराशिव,ढगाळ वातावरण राहून वळीव सरीचा पाऊस होईल. तर काही भागात जोरदार वळीव पाऊस होईल. 3/4/5 जुलै अनेक भागात मेघगर्जने सह जोरदार पाऊस वाढलेला राहील.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




7.विदर्भ 2 जुलै

पूर्व विदर्भ नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती,अकोला बुलढाना, वाशीम अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय आहे विदर्भ पाऊस काही भागात होईल पाऊचा जोर वाढलेला राहील जुलै संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता 2/3/4/5 जुलै वळीव मेघगर्जने सह पावसाला सुरवात होईल.


' जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस ' ' मंगळवार ४ जुलैपासून उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पाऊस

दक्षिणेकडे सरकलेला मान्सून ट्रफ व अरबी समुद्रातील ' ऑफशोर ट्रफमुळे परवा मंगळवार पासून कोकणा बरोबरच उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते मुसळदार पावसाची शक्यता आहे. सरासरी जुलै ८ ला देश काबीज करणारा मान्सून ६ दिवस अगोदरच २ जुलै ला देशात पोहोचला. जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असुन ६ जुलै पासून पूर्ण ओल असेल तेथे पेरणी करण्यास हरकत नाही, असे माकज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Updated : 3 July 2023 4:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top